मद्यपी प्रवाशाला विमानातच बांधले

By Admin | Updated: August 23, 2014 00:16 IST2014-08-23T00:16:46+5:302014-08-23T00:16:46+5:30

विमानात दारू पिऊन धिंगाणा घालणा:या एका भारतीय प्रवाशाला एअर इंडियाच्या कर्मचा:यांनी विमानात बांधून ठेवत धडा शिकविला.

Alcoholic traveler built on the plane | मद्यपी प्रवाशाला विमानातच बांधले

मद्यपी प्रवाशाला विमानातच बांधले

नवी दिल्ली : विमानात दारू पिऊन धिंगाणा घालणा:या एका भारतीय प्रवाशाला एअर इंडियाच्या कर्मचा:यांनी विमानात बांधून ठेवत धडा शिकविला. मेलबोर्न ते दिल्ली प्रवासात या दारुडय़ा महाशयाने धुमाकूळ घातल्यानंतर त्याला बांधून ठेवण्याचा पर्याय विमान कर्मचा:यांनी शोधला. विमान दिल्लीत उतरताच त्याला अटक करण्यात आली.
 या प्रवाशाचे वय 27 वर्षे असून दारूच्या नशेत  प्रताप केल्याबद्दल त्याच्यावर भादंवि कलम 323 आणि 341 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. बुधवारी या महाशयाने एआय-3क्1 या विमानात मद्य घेतल्यानंतर  विमान कर्मचारी आणि अन्य प्रवाशांसोबत हुज्जत घातली.
 त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. दोन अटेंडन्टस्चे कपडे फाडले, असे एअरलाईन्सच्या सूत्रंनी सांगितले. प्रकरण चांगलेच तापल्यानंतर प्रवासी आणि विमान कर्मचा:यांनी त्याला आसनाला बांधून ठेवले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Alcoholic traveler built on the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.