खेलासी लाल यांच्यावर भडकली अक्षरा; म्हणे, तर समर्थन करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:56 IST2025-10-27T09:55:51+5:302025-10-27T09:56:17+5:30
बिहार निवडणुकीत भोजपुरी कलाकारांत पेटला संग्राम

खेलासी लाल यांच्यावर भडकली अक्षरा; म्हणे, तर समर्थन करणार नाही
विभाष झा
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला असून यात भोजपुरी कलाकारही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध पक्षांच्या वतीने प्रचारात उतरलेल्या या कलाकारांतच आता महासंग्राम सुरू झाला आहे.
छपरातून राजदच्या चिन्हावर लढत असलेले खेसारी लाल यादव यांच्यावर अभिनेत्री अक्षरा सिंह चांगलीच भडकली. तिने खेसारी लाल निवडणूक लढवत असल्याचे आपल्याला माहितीच नाही, असे सांगितले. ते आपला जाहीरपणे अवमान करतात, असा आरोप तिने केला.
महिलांबाबत नुसत्याच घोषणा नकोत
भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकार राजकारणात येत असतील तर त्यांनी मोठे यश मिळवावे, पुढे वाटचाल करावी, असेही अक्षरा म्हणाली. खेसारी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना अक्षरा म्हणाली, ‘महिलांच्या सन्मानाच्या घोषणा देणाऱ्यांनी अगोदर आपण महिलांना कशी वागणूक देत आहोत, हे पण पाहायला हवे.’
माजी मंत्र्यासह ११ नेत्यांची हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून जनता दल - युनायटेड (जदयू) ने एका माजी मंत्र्यासह ११ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंदनकुमार सिंह यांनी याबाबत म्हटले आहे की, या नेत्यांनी पक्षाची विचारप्रणाली, शिस्त आणि संघटनात्मक तत्त्वांच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द केले जात आहे.