यात्रेमध्येच निखळलं अखिलेशच्या मर्सिडीज रथाचं चाक
By Admin | Updated: November 3, 2016 13:32 IST2016-11-03T12:33:17+5:302016-11-03T13:32:51+5:30
गुरुवारी सकाळी लखनऊमध्ये सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी हिरवा झेंडा दाखवताच रथ यात्रेला सुरुवात झाली पण अवघ्या एक किमीचे अंतर कापताच..

यात्रेमध्येच निखळलं अखिलेशच्या मर्सिडीज रथाचं चाक
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ३ - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची बहुचर्चित विकास रथ यात्रा मोठया गाजावाजामध्ये सुरु झाली खरी मात्र सुरुवातीलाच अखिलेशना त्यांच्या रथाने दगा दिला. गुरुवारी सकाळी लखनऊमध्ये सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी हिरवा झेंडा दाखवताच रथ यात्रेला सुरुवात झाली पण अवघ्या एक किमीचे अंतर कापताच अखिलेश यांचा हायटेक मर्सिडीज बेंझ रथ बंद पडला.
हा रथ दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. अखिलेश यांच्या या कार्यक्रमाला सपाचे प्रमुख मुलायमसिंह यादव उपस्थित रहाणार का ? याविषयी विविध तर्क-विर्तक मांडण्यात येत होते. अखेर मुलायम आणि प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी एकत्र उपस्थित राहून सस्पेन्स संपवला.
मागच्या काही दिवसात सपामधील अंतर्गत कलहाने टोक गाठले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यादव परिवाराने एकीचे दर्शन घडवले. पण एक किमीच्या अंतरावरच रथ बंद पडल्यामुळे सपा कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.