वडिलांच्या मतदारसंघातून अखिलेश यादव लढणार; रामपूरमधून आझम खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 00:36 IST2019-03-25T00:35:41+5:302019-03-25T00:36:06+5:30
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्या आझमगढ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

वडिलांच्या मतदारसंघातून अखिलेश यादव लढणार; रामपूरमधून आझम खान
लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्या आझमगढ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. मुलायमसिंह मैनपुरा या तुलनेने सुरक्षित मतदारसंघातून रिंगणात उतरत आहेत.
सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र आझम खान हेदेखील रामपूर मतदारसंघातून लढत देणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सपा-बहुजन समाज पार्टी (बसपा) व राष्ट्रीय लोक दल (रालोद) यांची युती आहे. राज्यातील ८० लोकसभा जागांपैकी सपा ३७, बसपा ३८, रालोद ३ जागा लढविणार आहे. तर अमेठी, रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडून देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ते आझमगढ व मैनपुरा या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले होते.
सपाने आपल्या ४० प्रमुख प्रचारकांची यादी जारी केली असून त्यामध्ये मुलायमसिंह यांच्या नावाचा समावेश न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.