शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींचा अखिलेश यादवांनी केला बचाव, म्हणाले, "निलंबित केल्याने सत्याच्या…’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:30 IST

Akhilesh Yadav defends Abu Azmi: मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असे म्हणत त्याची स्तुती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अबू आझमी यांचा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बचाव केला आहे.

मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असे म्हणत त्याची स्तुती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अबू आझमी यांचा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बचाव केला आहे. तसेच निलंबनामुळे सत्याचं तोंड कुलूप लावून बंद करता येईल, असं कुणाला वाटत असेल तर तो त्याचा बालिशपणा आहे, असा टोलाही अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

अबू आझमी यांनी औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. तसेच औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही, असा दावा अबू आझमी यांनी केला होता, या विधानांनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. तसेच आज विधानसभेत अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पारित करून त्यांना निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत  अबू आझमी यांना उत्तर प्रदेशात पाठवा, तिथे त्यांच्यावर इलाज केला जाईल,असे विधान केले होते. त्यानंतर अखिलेश यादव यांची अबू आझमी यांचा बचाव करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे. विचारसणी ही  निलंबनाचा आधार बनू लागली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यांमध्ये फारसा फरक उरणार नाही. आमचे आमदार, असो वा खासदार त्यांचा बिनधास्तपणा जबरदस्त आहे. मात्र  निलंबनामुळे सत्याचा आवाज दाबता येईल, असं जर काही लोकांना वाटत असेल तर तो त्यांचा नकारात्मक विचार आणि बालीशपणा ठरेल, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.  

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMaharashtraमहाराष्ट्र