Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 19:30 IST2025-04-13T19:29:27+5:302025-04-13T19:30:21+5:30
Akash Anand And Mayawati : मायावती यांची भाचा आकाश आनंद यांनी माफी मागितली आहे. आकाश आनंद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भाचा आकाश आनंद यांनी माफी मागितली आहे. आकाश आनंद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मी मायावती यांना एकमेव राजकीय गुरू आणि आदर्श मानतो. मी माझ्या कोणत्याही राजकीय निर्णयांसाठी माझ्या नातेवाईकांचा सल्ला घेणार नाही. माझी ही चूक माफ करा आणि मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या.”
“आज मी ही प्रतिज्ञा घेतो की बहुजन समाज पक्षाच्या हितासाठी, मी माझ्या नातेवाईकांना आणि विशेषतः माझ्या सासरच्या लोकांना कोणत्याही प्रकारे अडथळा बनू देणार नाही. काही दिवसांपूर्वी केलेल्या माझ्या ट्विटबद्दल मी माफी मागतो, ज्यामुळे मायावती यांनी मला पक्षातून काढून टाकलं आहे. आतापासून मी माझ्या कोणत्याही राजकीय निर्णयासाठी कोणत्याही नातेवाईकाचा किंवा सल्लागाराचा सल्ला घेणार नाही” असं म्हटलं आहे.
1. बी.एस.पी की राष्ट्रीय अध्यक्ष, यू.पी. की चार बार रही मुख्यमंत्री एवं लोकसभा व राज्यसभा की भी कई बार रही सांसद आदरणीया बहन कु. मायावती जी को मैं अपना दिल से एकमात्र राजनीतिक गुरू व आदर्श मानता हूं। आज मैं यह प्रण लेता हूं कि बहुजन समाज पार्टी के हित के लिए मैं अपने रिश्ते-नातों…
— Akash Anand (@AnandAkash_BSP) April 13, 2025
मायावती यांची आकाश आनंद यांनी माफी मागितली आणि सांगितलं की, “मी फक्त आदरणीय मायावती यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करेन. मी माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या आणि पक्षातील लोकांना पूर्ण आदर देईन आणि त्यांच्या अनुभवांमधून खूप काही शिकेन.”
“मी मायावती यांना आवाहन करतो की माझ्या सर्व चुका माफ करा आणि मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या, यासाठी मी नेहमीच त्यांचा आभारी राहीन. तसेच भविष्यात मी अशी कोणतीही चूक करणार नाही ज्यामुळे पक्ष आणि मायावती यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल.” गेल्या महिन्यात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकलं होतं.