अजितसिंग, अझरुद्दीन यांच्या निवासस्थानांची वीज तोडली

By Admin | Updated: September 14, 2014 02:21 IST2014-09-14T02:21:42+5:302014-09-14T02:21:42+5:30

माजी केंद्रीय मंत्री अजितसिंग, माजी खासदार जितेंद्रसिंग, मोहम्मद अझरुद्दीन यांना सरकारी निवासस्थान रिकामे न केल्याचा फटका बसला.

Ajit Singh, Azharuddin's house was damaged | अजितसिंग, अझरुद्दीन यांच्या निवासस्थानांची वीज तोडली

अजितसिंग, अझरुद्दीन यांच्या निवासस्थानांची वीज तोडली

फराज अहमद - नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री अजितसिंग, माजी खासदार जितेंद्रसिंग, मोहम्मद अझरुद्दीन यांना सरकारी निवासस्थान रिकामे न केल्याचा फटका बसला. सरकारने धडक कारवाई करताना त्यांच्याकडील वीज आणि पाणीपुरवठा तोडला   आहे.
सरकारने एकूण 3क् सरकारी निवासस्थानांची वीज तोडली आहे. या सर्वाना घर खाली करण्यासाठी पुरेसा वेळ दिला असतानाही त्यांनी टाळाटाळ चालविल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे नवी दिल्ली महापालिकेच्या (एनडीएमसी) वरिष्ठ अधिका:याने सांगितले. सदर कारवाईबाबत लोकसभेच्या गृहनिर्माण समितीला अहवाल सादर करण्यात आला आहे. माजी नागरी विमान वाहतूक मंत्री अजितसिंग यांच्या तुघलक रोड निवासस्थानी गेल्या आठवडय़ात घर रिकामे करवून घेणारे पथक पोलिसांसह गेले असता त्याला जोरदार विरोध झाला होता.
नव्या खासदारांना वाटप करण्यात आलेल्या निवासस्थानांच्या स्थितीचा लोकसभेच्या समितीने आढावा घेतला आहे. घरे रिकामे करण्यासाठी 4 सप्टेंबर्पयत मुदत देण्यात आल्यानंतर दुस:या दिवसांपासून वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली. एनडीएमसीने ल्युटियन भागातील 26 घरांचा 
वीज आणि पाणीपुरवठा तोडला 
तर तीन घरांवर सीपीडब्ल्यूडीने कारवाई   केली. 
माजी खासदार नीरज शेखर, विनय इंदर सिंगला, अवतारसिंग भदाना, धनंजयसिंग, के.एस. राव यांचा कारवाई करण्यात आलेल्या         3क् माजी खासदारांमध्ये समावेश  आहे. 
 
36 वर्षापूर्वी मिळालेले निवासस्थान सोडावे लागणार
च्चरणसिंग कुटुंबाला 36 वर्षापूर्वी मिळालेले निवासस्थान अजितसिंगांना रिकामे करावे लागणार. चौधरी चरणसिंग उपपंतप्रधान बनल्यानंतर 1978 मध्ये वास्तव्याला होते. चौधरी चरणसिंगांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी गायत्रीदेवी तेथे राहात असत.
 
कलमाडी यांच्यासह काही नेते मात्र अपवाद ठरले 
च्संपुआ सरकारच्या काळात वेंकय्या नायडू मंत्री नव्हते मात्र त्यांनी औरंगजेब मार्गावरील निवासस्थान कायम ठेवले होते.
च्मे 2009 ते जुलै 2010 या काळात रामविलास पासवान हे मंत्री नसतानाही 12 जनपथ बंगल्यात राहात होते. त्यांना कोणतेही पद नसताना संपुआ सरकारने कधीही नोटीस पाठविली नव्हती.
 
च्एस जयपाल रेड्डी यांनी  8, 30 जानेवारी मार्ग निवासस्थान सोडले असून आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. लालूप्रसाद यादव यांचे 25 तुघलक रोड येथील बंगल्यात वास्तव्य असून सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे घर रिकामे करण्यासाठी तूर्तास त्यांच्यावर दबाव आणला जाणार नाही.
च् माजी मंत्री सुरेश कलमाडी यांचे कामराज लेन येथील बंगल्यात अजूनही वास्तव्य आहे. त्यांनी अवाढव्य खर्च करीत इटालियन टाईल्स, आकर्षक बाथरूमसह आणि बदल करीत बंगल्याचे रूप पालटून टाकले होते.

 

Web Title: Ajit Singh, Azharuddin's house was damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.