शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

तीन एफएसआयला राष्ट्रवादीचा विरोध विकास आराखडयावर अजित पवारांची सरप्राईज बैठक

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) उठविण्यात आलेली आरक्षणे, रद्द करण्यात आलेले प्रमुख डीसी रूल तसेच मेट्रोसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली शहरात ी बांधकामाकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या तीन एफएसआयला विरोध करण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. याबाबतच्या सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी महापालिकेच्या पदाधिका-यांसह नगरसेवकांना स्वत: कडक शब्दात दिल्या . तसेच विकास आराखडयाबाबत कोणतेही गटतट न करता, पक्षाचा विचार करून शहरासाठी निर्णय घेण्याचे सांगत डीपीवरून नाराज नगरसेवकांचे कानही पवार यांनी टोचले आहेत. त्यामुळे डीपीतील तीन एफएसआयवरून सर्वपक्षात एकमत होण्याची शक्यता असून आरोप प्रत्यारोपामुळे मुख्यसभेत मान्यतेसाठी रखडलेला डीपी मान्य होण्याचा रस्ताही मोकळा झाला असल्याच्

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) उठविण्यात आलेली आरक्षणे, रद्द करण्यात आलेले प्रमुख डीसी रूल तसेच मेट्रोसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली शहरात ी बांधकामाकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या तीन एफएसआयला विरोध करण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. याबाबतच्या सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी महापालिकेच्या पदाधिका-यांसह नगरसेवकांना स्वत: कडक शब्दात दिल्या . तसेच विकास आराखडयाबाबत कोणतेही गटतट न करता, पक्षाचा विचार करून शहरासाठी निर्णय घेण्याचे सांगत डीपीवरून नाराज नगरसेवकांचे कानही पवार यांनी टोचले आहेत. त्यामुळे डीपीतील तीन एफएसआयवरून सर्वपक्षात एकमत होण्याची शक्यता असून आरोप प्रत्यारोपामुळे मुख्यसभेत मान्यतेसाठी रखडलेला डीपी मान्य होण्याचा रस्ताही मोकळा झाला असल्याची चर्चा आहे.
डीपी मध्ये उठविण्यात आलेली आरक्षणे आणि बांधकाम नियमांच्या तरतुदीबाबत राष्ट्रवादीसह सर्वच राजकिय पक्षांमध्ये वेगवेगळी मते आहेत.त्यातच डीपीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्याने राष्ट्रवादी कडून नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी दहा सदस्यांची समिती नेमली आहे. बुधवारी पवार यांनी या महापौर बंगल्यावर या समितीबरोबर बैठक शहराध्यक्ष आणि खासदार अँड. वंदना चव्हाण यांनी बोलाविली होती. याच वेळी पवार यांचा खासदार चव्हाण यांना दूरध्वनी आला, यावेळी चव्हाण यांनी ही बैठक सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्यावेळी ती सुरू ठेवण्याच्या सूचना देत अवघ्या दहा मिनिटात कोणासही पूर्व सूचना न देता, पवार या बैठकीस आले. त्यामुळे सर्वच नगरसेवकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यावेळी पवार यांनी स्वत: डीपी मध्ये मेट्रो झोनसह संपुर्ण शहरासाठी जो तीन एफएसआयची तरतुद करण्यात आली आहे. त्यास पक्षाच्यावतीने विरोध करा असे सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
तीन एफएसआय दिल्यास जे नागरिकरण वाढेल त्यासाठी ड्रेनेज, पाणी या सोयी-सुविधा कशा पुरविणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.े. दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचाही वाढीव एफएसआयला विरोध होता. त्याप्रमाणे कॉंग्रेसने तीन एफएसआयला विरोध करण्याची भुमिका पक्षाच्या बैठकित घेतली आहे. त्यामुळे डीपीतील तीन एफएसआयची शिफारस बारगळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
====================
पवार यांनी केलेल्या काही प्रमुख सूचना
* 1987च्या आराखडयातील आरक्षणे कायम ठेवा
* पेठा वगळता इतर शहरातील रस्ता रूंदीकरण रद्द करू नये
* आर्थिक दुर्बल घटकांची घरकुल योजनांची (ईडब्लूएस) आरक्षणे कायम ठेवा
* इमारतींसाठी जी फायर एनओसी देण्याचे आयुक्तांचे जे अधिकार आहेत. ते कायद्याप्रमाणे कायम ठेवण्यात यावे.
* अँमीनीटी स्पेसची आरक्षणे वगळू नका
* इमारतीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करावा
*उंच इमारतींमधील दोन जिन्यांची तरतूद कायम ठेवा
-----------------------------