शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांनी दिल्लीत दंड थोपटले, राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांची पहिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:23 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी शनिवारी ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आम आदमी पक्षाने सर्व ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपची मात्र अद्याप एकही यादी आलेली नाही.

चंद्रशेखर बर्वे -

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आता दिल्लीत पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी शनिवारी ११ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आम आदमी पक्षाने सर्व ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपची मात्र अद्याप एकही यादी आलेली नाही.

राकाँने मुलायम सिंह (बदली), रतन त्यागी (बुरारी), खालिद उर रहमान (चांदणी चौक), मोहम्मद हारुण (बल्लीमारन), इम्रान सैफी (ओखला), नरेंद्र तन्वर (छतरपूर), नमाहा (लक्ष्मी नगरमधून), जगदीश भगत (गोकुळपुरी), खेम चंद (मंगोलपुरी), राजेश लोहिया (सीमापुरी) आणि कमर अहमद (संगम विहार) यांना उमेदवारी दिली आहे.

पुन्हा दर्जा मिळवणारब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राकाँ आधी राष्ट्रीय पक्ष होता. हा दर्जा पुन्हा मिळविण्याचे लक्ष्य अजित पवार यांनी निर्धारित केले आहे. राकाँ रालोआचा घटक पक्ष असला तरी दिल्लीत आघाडी न झाल्यामुळे पक्षाने पहिली यादी जाहीर केली. दिल्लीत जवळपास २५ उमेदवार उतरविण्याची तयारी राकाँने केली असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारdelhi electionदिल्ली निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस