शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 18:59 IST

हे प्रकरण इतके गंभीर आहे की, अजित पवार  गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली.

नवी दिल्ली – राष्ट्रवादी कुणाची यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी शरद पवार गटाने मोठा दावा करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने आयोगासमोर दाखल केलेले शपथपत्रे बोगस असल्याचं शरद पवार गटाने म्हणत अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाची बाजू मांडणारे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, जवळपास दीड तास निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. आम्ही आजच्या सुनावणीत अनेक धक्कादायक वस्तूस्थिती आयोगासमोर ठेवली. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी आयोगासमोर दाखल केलीत, जवळपास २० हजार प्रतिज्ञापत्रे आम्ही तपासली. त्यातील ८९०० प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचे आम्ही सांगितले. जी व्यक्ती मृत आहे त्यांचेही प्रतिज्ञापत्र दाखल केलेत. काही अल्पवयीन लोकांचे प्रतिज्ञापत्र दिलेत, काही अशी पदे आहेत जी राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात नाही. काही कागदपत्रात केवळ हाऊसवाईफ, झॉमेटो सेल्समन म्हणून सह्या केल्या आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आम्ही २४ कॅटेगिरी बनवली असून त्यातून अजित पवार गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे बोगस आहेत. बनावटरित्या तयार करण्यात आली आहेत. केवळ खोट्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी हा प्रयत्न केला गेला. याचा अर्थ असा अजित पवार गटाकडे कुठलेही समर्थन नाही. हे प्रकरण इतके गंभीर आहे की, अजित पवार  गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली. खोटी कागदपत्रे, खोटे जबाब नोंदवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० तारखेला होणार असून या प्रकरणात सत्याचा विजय होईल असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे.

काय आहे वाद?

 शिवसेनेपाठोपाठ अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीतच २ गट पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर अजित पवार गटाने हा पक्षाचा निर्णय असून राष्ट्रवादी म्हणूनच ते सरकारमध्ये सहभागी झाल्याचं सांगितले. एकप्रकारे अजित पवार गटाने राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. त्यानंतर खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला. सध्या निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यात सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणी निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग