शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जयशंकर यांच्यापेक्षा डोवालांची मुत्सद्देगिरी यशस्वी, भारताच्या युद्धसज्जतेसमोर ड्रॅगन नरमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 05:43 IST

रशिया, अमेरिका, जपान भारताच्या बाजूने; भारताची आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत रणनीती यशस्वी

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : पुन्हा एकदा निर्णायक क्षणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या रणनितीमुळे चीनला नियंत्रण रेषेत त्या्ंच्याच हद्दीत मागे सरकावे लागले. चीनविरोधातभारताची आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत रणनिती यशस्वी ठरली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करताना डोवाल यांनी योग्य शब्दात समज दिली. गलवान खोऱ्यात झटापट झालेल्या ठिकाणापासून दोन्ही देशांचे सैनिक दीड किमी आपापल्या देशांच्या हद्दीत मागे परतले आहे.अत्यंत मुत्सद्देगिरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेला तणाव तूर्त कमी केला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या पारंपारिक राजनैतिक रणनितीपेक्षा अजित डोवाल यांची मुत्सद्देगिरी महत्त्वाची ठरला. एकाचवेळी जपान, रशिया, अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या देशांना भारताच्या बाजून वळवण्यासाठी डोवाल यांनी कौशल्य पणाला लावले. पंतप्रधानांचा लेह दौरा, तेथील भाषण डोवाल यांनीच निश्चित केले होते. परराष्ट्र धोरणावर पंतप्रधानांचे मत परराष्ट्र मंत्रालयाकडूनच ठरवण्यात येते. सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधनदेखील डोवाल यांनीच निश्चित केले. युसी ब्राऊझर, टीकटाँकसारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्याची रणनितीदेखील मोदी व डोवाल यांच्याच बैठकीत ठरली.हे मुद्दे ठरले महत्त्वाचेकोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या चीनला भारतविरोध महागात पडला आहे. आर्थिकदृष्ट्या भारत चीनच्या नियार्तीवर अवलंबून आहे.दोन्ही देशांमधील अर्थव्यवहारात भारताचा वाटा केवळ १० टक्के आहे. त्यामुळे भारताच्या नो चायना धोरणाला प्रत्यूत्तर देताना चीनसमोर आॅस्ट्रेलियासारखा पर्याय खुला नव्हता.आॅस्ट्रेलियातून मांस चीनला पाठवण्यात येते. त्यावरच चीनने काही दिवसांपूर्वी बंदी घातली होती. सीमेलगतच्या देशांमधून एफडीआयसाठी परवानगीची अट घातल्यानेदेखील चीनची कोंडी झाली.देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेत चीनने १ टक्क्याची (१७०० कोटी) गुंतवणूक केल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावर चिनी दूतावासाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.पंतप्रधानांचा लेह दौरा व भाषण भारत-चीन संबंधांमध्ये मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. थेट पंतप्रधानच बोलल्याने भारत आपली भूमिका बदलणार नसल्याचा संदेश चीनला मिळाला.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनladakhलडाखAjit Dovalअजित डोवाल