अजय बिसारिया यांची पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 13:58 IST2017-11-02T13:54:46+5:302017-11-02T13:58:47+5:30

पोलंडमधील भारतीय राजदूत आणि अनुभवी राजनाईक अजय बिसारीया यांची पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे.

Ajay Bisaria appointed as High Commissioner of India to Pakistan | अजय बिसारिया यांची पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  

अजय बिसारिया यांची पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  

नवी दिल्ली - पोलंडमधील भारतीय राजदूत आणि अनुभवी राजनाईक अजय बिसारीया यांची पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती  करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री उशीरा याबाबत घोषणा केली. अजय बिसारीया हे 1987 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते आता गौतम बंबावले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबावले यांची चीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. अजय बिसारीया लवकरच कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा आहे असं मंत्रालयाने एका अधिकृत विधानामध्ये म्हटलं.  
कोण आहेत अजय बिसारीया -
अजय बिसारिया 1988-91 मध्ये मॉस्को दूतावासमध्ये तैनात होते. त्यांनी 1999-2004 दरम्यान पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून देखील काम केलं आहे. जानेवारी, 2015 पासून ते पोलंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.   

Web Title: Ajay Bisaria appointed as High Commissioner of India to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.