ऐश्वर्याने सेटलमेंटसाठी मागितले ३६ कोटी; तेजप्रताप यादव यांचा रक्कम देण्यास मात्र नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:08 IST2025-02-19T07:07:52+5:302025-02-19T07:08:11+5:30
राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटप्रकरणी कौटुंबिक न्यायालयात सुनावणी झाली.

ऐश्वर्याने सेटलमेंटसाठी मागितले ३६ कोटी; तेजप्रताप यादव यांचा रक्कम देण्यास मात्र नकार
विभाष झा
पाटणा : राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटप्रकरणी कौटुंबिक न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी न्यायमूर्ती अरुण कुमार झा यांच्यासमोर झाली. यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वादविवादादरम्यान न्यायाधीशांनी ऐश्वर्या रायचे वकील अभिनव श्रीवास्तव आणि निलांजन चॅटर्जी यांना विचारले की, अंतिम सेटलमेंटसाठी किती पैशांची मागणी करण्यात आली होती. यावर तेज प्रताप यादव यांचे वकील जगन्नाथ सिंह यांनी न्यायालयाला सांगितले की, समोरील पक्षाकडून ३६ कोटी रुपयांची एकरकमी मागणी करण्यात आली होती. दोन्ही कुटुंबांमध्ये याबाबत बैठक झाल्यानंतर ही बैठक ठरली होती.
कोर्टाने हे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील सुनावणी ८ आठवड्यांनंतर ठेवू असे सांगितले. सध्या हे प्रकरण पाटणाच्या कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. पाटण्यातील एका हॉटेलमध्ये जेव्हा दोन्ही कुटुंबे एकत्र आली होती, तेव्हा लालू प्रसाद यादवही उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऐश्वर्याला हवे राबडींसारखे घर, कार आणि नोकर
या हायप्रोफाइल प्रकरणातील पीडित ऐश्वर्या राय हिला तिची सासू राबडी देवी यांच्यासारखे निवासस्थान हवे आहे. याचसोबत कार, ती चालविण्यासाठी चालक आणि घरात नोकर हवे आहेत.
याशिवाय ऐश्वर्याने मासिक दीड लाख रुपयांचा खर्चही भत्त्याच्या स्वरूपात मागितला आहे. हे घर पाटणामधील पॉश एरिया एसके पुरीमध्ये असल्याचे सांगितले जाते.
वास्तविक, यापूर्वी गोला रोड येथे तीन खोल्यांचा फ्लॅट ऐश्वर्याला देण्यात आला होता. यासाठी दरमहा २० हजार रुपये खर्चही केले जात होते. तेजप्रताप यादव, यांनी सेटलमेंट करण्यास नकार दिल्याचे कळते.