4 जी मध्ये एअरटेल आहे जिओ पेक्षा फास्ट
By Admin | Updated: October 21, 2016 20:10 IST2016-10-21T16:28:40+5:302016-10-21T20:10:30+5:30
4जी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये एअरटेल सर्वात फास्ट असल्याचे समोर आले आहे. ओल्काच्या स्पीडडस्ट आणि ट्रायच्या मायस्पीड पोर्टलवरील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे

4 जी मध्ये एअरटेल आहे जिओ पेक्षा फास्ट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - 4जी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये एअरटेल सर्वात फास्ट असल्याचे समोर आले आहे. ओल्काच्या स्पीडडस्ट आणि ट्रायच्या मायस्पीड पोर्टलवरील अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. 'ट्राय'च्या मायस्पीड पोर्टलवर प्रकाशित झालेल्या 4जी इंटरनेट स्पीडच्या आलेखामध्ये एअरटेल 4जीवर डाऊनलोडिंगचा वेग सर्वाधिक म्हणजे 11.4 एमबीपीएस एवढा असल्याचे समोर आले आहे.
ट्रायने इंटरनेट स्पीडची चाचणी घेणारे मायस्पीड हे अॅप हल्लीच सुरू केले आहे. या अॅपवर जाऊन तुम्हाला रिलायन्स जिओचा 4जी इंटरनेच स्पीड तपासायचा असल्यास तुम्हाला ऑपरेटर म्हणून जिओची निवड करून, टेक्नॉलॉजीमध्ये 4जी चा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर 4जी सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांच्या वेगाची तुलना करता येईल. ट्रायच्या अॅपवर येणाऱ्या आकडेवारीनुसार एअरटेल 4जीवरील डाऊनलोडिंगचा वेग सर्वाधिक म्हणजे 11.4 एमबीपीएस एवढा आहे. तर 7.9 एमबीपीएस वेगासह रिलायन्स दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर आयडिया आणि व्होडाफोन यांचा क्रम लागतो. तर 6.2 एमबीपीएस वेगासह रिलायन्स जिओ सर्वात शेवटी पाचव्या क्रमांकावर आहे.