अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:18 AM2023-12-03T10:18:52+5:302023-12-03T10:19:23+5:30

विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे. 

Airport in Ayodhya only 5 percent work left; The design of the building is on the lines of a temple | अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

त्रियुग नारायण तिवारी

अयोध्या : नव्या वर्षात २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्या आधीच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू केले जाणार आहे. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत हे विमानतळ तयार होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य सिंदिया आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी शनिवारी भेट देऊन विमानतळाच्या कामाची पाहणी केली व स्थितीचा आढावा घेतला. विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. 

कसे असेल विमानळ?
विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे. 
या कामासाठी एकूण ३२० कोटींचा खर्च येणार आहे. ६,६०० चौरस फूट मीटरची इमारत बांधण्यात येणार आहे.
विमानतळाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम राजस्थानी बंशी पहाडपूर येथील दगडांमधून केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी २२०० मीटर लांब व ४५ मीटर रुंद धावपट्टी बांधली आहे. एका वेळी ५०० प्रवासी येथे उतरू शकतात, इतकी याची क्षमता आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू केली जातील. देशभरातील सर्व राज्य तसेच मोठ्या शहरांनी विमानतळांशी कनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणे
एअर पोर्ट प्राधिकरणाचे प्रकल्प अभियंता राजीव कुलश्रेष्ठ म्हणाले की, दुसऱ्या टप्यात ५० हजार चौरस फुटांची इमारत बांधली जाईल. त्यावेळी आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सोय केली जाईल. यासाठी ३७५० मीटरचा रनवे तयार केला जाणार आहे.

धुक्यातही लँडिंगची सुविधा 
लोकलायजर, गाइड पथ, मार्कर, डीएमई कॅलिब्रेशन आदी कामे पूर्ण झाली आहेत. रनवे सेफ्टी एरिया मानकानुसार काम धावपट्टीचे काम करण्यात आले आहे. रनवे आणि कॅट लायटिंगमुळे रात्री किंवा धके असतानाही इथे लँडिग करणे शक्य होणार आहे. 

Web Title: Airport in Ayodhya only 5 percent work left; The design of the building is on the lines of a temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.