बंगळुरुत भररस्त्यात फाडले हवाईसुंदरीचे कपडे

By Admin | Updated: February 20, 2017 13:39 IST2017-02-20T13:32:05+5:302017-02-20T13:39:42+5:30

आयटी सिटी म्हणून ओळख असलेले बंगळुरु शहर दिवसेंदिवस महिलांसाठी धोकादायक बनत चालले आहे.

Airplane clothes ripped in Bangalore | बंगळुरुत भररस्त्यात फाडले हवाईसुंदरीचे कपडे

बंगळुरुत भररस्त्यात फाडले हवाईसुंदरीचे कपडे

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. 20 - आयटी सिटी म्हणून ओळख असलेले बंगळुरु शहर दिवसेंदिवस महिलांसाठी धोकादायक बनत चालले आहे. बंगळुरुत एचआरबीआर या पॉश लोकवस्तीच्या भागात भररस्त्यात एका हवाईसुंदरीची छेडछाड करुन तिचे कपडे फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
 
12 फेब्रुवारीला रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. हवाई सुंदरी तिच्या मैत्रिणीसोबत एचआरबीआर येथे असताना एक दुचाकीस्वार तिथे आला. त्याने हवाईसुंदरीच्या शरीरावर जबरदस्ती सुरु केली. त्यावेळी तिथे असलेल्या दोन महिलांनी आरडाओरडा केल्याने तो तिथून पळून गेला. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
काही दिवसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी अजून फरार आहे. अलीकडेच बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री ब्रिगेड रोडवर नववर्ष स्वागतासाठी जमलेल्या तरुणींचा जमावाने विनयभंग केला होता. अक्षरक्ष पाठलाग करुन तरुणींचा विनयभंग करण्यात आला होता.  या घटनेच्या आठवणी अद्यापही या शहराच्या मनात ताज्या आहेत. 
 

Web Title: Airplane clothes ripped in Bangalore