शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

एअरहोस्टेसने लगावली पायलटच्या थोबाडीत, मोबाइल फोडून केला चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 12:06 PM

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर एका एअरहोस्टेसने वादावादीनंतर वैमानिकाला थोबाडीत लगावली असल्याची घटना घडली आहे.

जयपूर, दि. 5 - जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर एका एअरहोस्टेसने वादावादीनंतर वैमानिकाला थोबाडीत लगावली असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. एअरहोस्टेस गुडगावची राहणारी असून अर्पिता असं तिचं नाव आहे. वैमानिकाचीही ओळख पटली आहे. दोघांमधील वाद वाढल्यानंतर विमानतळावरील उपस्थित सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरहोस्टेस इतक्या रागात होती की तिने वैमानिकाचा फोन घेऊन चक्काचूर करुन टाकला. यानंतर तिथे उपस्थित सीआयएसएफ जवानांना मध्यस्थी करावी लागली. यावेळी विमानतळ अधिका-यांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. सांगानेर पोलीस स्थानकात घटनेची माहिती देण्यात आली आहे. 

सांगानेर पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवरतन गोदरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुरक्षारक्षकांना अगोदर हे त्यांचं खासगी प्रकरण आहे असं वाटल्याने मध्यस्थी केली नाही. मात्र नंतर त्यांचं भांडण वाढलं आणि मारामारी करु लागले. भांडण वाढू लागल्याने लोकांची गर्दी जमा होऊ लागली. मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिक काही वेळापुर्वीच तिथे पोहोचला होता. तर एअरहोस्टेस गुडगावहून आल होती. प्रकरणाचा तपास सुरु आहे'.

सध्या दोघांची चौकशी करत असून हा त्यांचा वैयक्तिक वाद असण्याची शक्यता आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

एअरहोस्टेसला बळजबरीने कॉकपिटमध्ये बसवणा-या पायलटला स्पाइसजेटने केले निलंबित

आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान एका एअरहोस्टेसला आपल्यासोबत कॉकपिटमध्ये जबरदस्तीने बसवणा-या पायलटला स्पाइसजेटने निलंबित केले होते. गतवर्षी ही घटना घडली होती. या आरोपी पायलटने केवळ त्या एअरहोस्टेसला जबरदस्तीने कॉकपिटमधील आपल्या सीटवरच बसवले नाही तर आपल्या सहवैमानिकालाही कॉकपिटच्या बाहेर काढले होते. २८ फेब्रुवारी 2016 रोजी कोलकाता येथून बँकॉकला जाणा-या विमानात ही घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी सुरू होती, अखेर दोन महिन्यांनी स्पाइसजेटने त्या वैमानिकाला निलंबित केले होते. 

कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला कॉकपीटमध्ये पायलटच्या जागेवर बसवणे हे नियमांचे गंभीर उल्लंघन मानले जाते. तसेच विमानात एअर होस्टेसचे केले जाणारे शारीरिक शोषण हाही एक गंभीर गुन्हा आहे. दरम्यान या आरोपी पायलटने त्याच दिवशी परत येताना रात्रीच्या वेळेस पुन्हा ही लज्जास्पद वर्तणूक केली होती. 

टॅग्स :AirportविमानतळCrimeगुन्हा