शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Air India Ukraine Flight: खासगी झाली तरी एअर इंडिया आली धावून; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:45 IST

Air India Ukraine Flight: रशियाने सैन्य माघारीचे वारंवार सांगितले जरी असले तरी तसे प्रत्यक्षात दिसत नाहीय. यामुळे भारत सरकारने युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा व मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियाने सैन्य माघारीचे वारंवार सांगितले जरी असले तरी तसे प्रत्यक्षात दिसत नाहीय. यामुळे भारत सरकारने युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा व मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे याची जबाबदारी नुकतेच खासगीकरण झालेल्या एअर इंडियाकडे देण्यात आली आहे. एअर इंडियाने याची माहिती दिली आहे. 

युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना बोरिस्पिल इंटरनॅशनल एयरपोर्टवरून आणण्यात येणार आहे. यासाठी एअर इंडिया सुरुवातीला तीन विमानोड्डाणे करणार आहे. २२, २४ आणि २६ फेब्रुवारीला ही विमाने युक्रेनला जाणार असून याच दिवशी ती परत विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशी परतणार आहेत. 

एअर इंडियाची कार्यालये, वेबसाईट आणि कॉल सेंटर, अधिकृत एजंट यांच्याद्वारे तिकीट बुक करण्याचे आवाहन एअर इंडियाने केले आहे. नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने भारत आणि युक्रेनदरम्यान संचलित केली जाणारी उड्डाणांवरील बंदी उठविली आहे. तसेच सीटवरील निर्बंधही हटविले आहेत. याचबरोबर देशातील विमान कंपन्यांना युक्रेनच्या विमानफेऱ्या सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर एअर इंडियाने युक्रेनसाठी तीन विमाने पाठविणार असल्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाची कंपनी जरी बदलली असली तरी त्यांच्याकडे आधीच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाग घेतलेले अनेक कर्मचारी आहेत. जर उद्या तशीच परिस्थिती उद्भवली तर त्याचा फायदा एअर इंडियाला होणार आहे. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या मोठ्या संख्येने भारतीयांना भारतात परतायचे आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने बुधवारी सांगितले की अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी नजीकच्या भविष्यात आणखी फ्लाइट्सची व्यवस्था करण्याची योजना आहे. दूतावासाने सांगितले होते की, त्यांना अनेक भारतीयांचे फोन येत आहेत ज्यात युक्रेनमधून भारतात विमाने उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना काळजी करू नये आणि भारतात जाण्यासाठी फ्लाइट बुक करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाrussiaरशियाwarयुद्ध