शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:19 IST

Air India Plane Crash Photos: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यात अनेक जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Air India Plane Crash in Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमध्येएअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यात अनेक जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला असून या घटनेची भयावह दृश्य आता समोर येऊ लागली आहेत. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात रहिवासी भागावर हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे दुर्घटनाग्रस्त भागातील काही इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. तर परिसरातील वाहनं देखील जळून खाक झाली आहेत. वाहनांचे तर फक्त सांगाडे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. 

एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर ७८७ हे विमान बरंच मोठं विमान आहे. ज्याची प्रवासी क्षमता २४२ इतकी आहे. त्यात हे विमान अहमदाबाद ते लंडन असा थेट प्रवास करणारं होतं. त्यामुळे विमानाच्या इंधन टाक्या देखील पूर्णपणे भरलेल्या होत्या. इंधन टाक्या भरलेल्या असल्यानं अपघाताची तीव्रता वाढल्याचं दिसून येत आहे. विमान खाली कोसळताच आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या. त्यानंतर विमानाचा फक्त मलबा शिल्लक राहिल्याचा दिसून येत आहे.

प्रवासी विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती रुग्णालयाची इमारत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची दाट शक्यता आहे. परिसरात सर्वत्र धुराचे लोट असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातahmedabadअहमदाबादairplaneविमानAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातViral Photosव्हायरल फोटोज्Viral Videoव्हायरल व्हिडिओ