एअर इंडियाचे विमान आकस्मिक उतरवले
By Admin | Updated: August 23, 2014 01:57 IST2014-08-23T01:57:17+5:302014-08-23T01:57:17+5:30
एअर इंडियाच्या नवी दिल्ली ते अहमदाबाद दरम्यानच्या एअरबस 321 च्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे जयपूर विमानतळावर त्याचे आज आकस्मिक लँडिंग करण्यात आले.

एअर इंडियाचे विमान आकस्मिक उतरवले
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या नवी दिल्ली ते अहमदाबाद दरम्यानच्या एअरबस 321 च्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे जयपूर विमानतळावर त्याचे आज आकस्मिक लँडिंग करण्यात आले.
दिल्ली विमानतळावरून पहाटे 6 वाजता निघालेले हे विमान काही अंतरावर जाताच विमानाच्या इंजिनात काहीतरी बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ जयपूर विमानतळावर त्याची सूचना देऊन विमान उतरविण्याची परवानगी मागितली.
जयपूरच्या सांगानेर विमानतळाचे संचालक एस.एन. बोरकर यांनी, हे विमान सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी येथे सुरक्षित उतरल्याचे व त्यातील एकूण 1क्4 प्रवासी सुखरूप असल्याचे सांगितले.
या प्रवाशांना नंतर दुस:या विमानाने अहमदाबादकडे
रवाना करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)