शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:43 IST

२७ वर्षापूर्वी १९९८ साली  जो विमान अपघात घडला त्यात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता आणि हा व्यक्तीही विमानात 11A सीटवर बसला होता

अहमदाबाद - गुजरातमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात होऊन २९७ लोकांचा जीव गेला आहे. या दुर्घटनेतील विमानातील केवळ एकमेव प्रवासी जिवंत वाचला आहे. रमेश विश्वासकुमार हे दुर्घटनेतून बचावल्यामुळे हा चमत्कारच घडल्याचं मानले जात आहे. रमेश विमानात 11A सीटवर बसले होते, जेव्हा प्लेन क्रॅश झाले तेव्हा तिथला आपत्कालीन दरवाजा उघडला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत ते जखमी झाले असले तरी सुखरूप वाचले आहे. परंतु २७ वर्षापूर्वी अशाच एका अपघातात थाई अभिनेत्याचा जीव वाचला होता. 

विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला

२७ वर्षापूर्वी १९९८ साली  जो विमान अपघात घडला त्यात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता आणि हा व्यक्तीही विमानात 11A सीटवर बसला होता. त्यामुळे हा कसला संयोग म्हणावा असा प्रश्न लोकांना पडला आहे. थायलँडमधील अभिनेता रुआंगसाक लोयचुसाकने सांगितले की, जेव्हा मी एअर इंडियाच्या विमान क्रॅशबाबत ऐकले तेव्हा एक अजब संयोग जाणवून आला. ११ डिसेंबर १९९८ साली मी २० वर्षाचा होतो तेव्हा थाई एअरवेजने फ्लाइट नंबर TG261 चा अपघात घडला. त्यात १४६ प्रवासी होते त्यातील १०१ लोकांचा मृत्यू झाला होता. 

फेसबुकवर लिहिली पोस्ट

४७ वर्षीय रुआंगसाक लोयचुसाक यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, जेव्हा मला एअर इंडियाच्या विमान अपघातात रमेश विश्वासकुमार हा ब्रिटीश नागरिक चमत्कारिकपणे वाचल्याचे कळले आणि या अपघातावेळी तो 11A वर बसल्याचे सांगितले तेव्हा मला जुनी आठवण ताजी झाली आणि माझ्या अंगावर काटा आला. माझ्यासोबत घडलेल्या विमान अपघाततही माझा सीट नंबर 11A हाच होता. माझा जीवही त्या अपघातातून नशिबाने वाचला होता. भारतातील विमान अपघातात वाचलेला व्यक्ती तो माझ्यासारखाच 11A सीटवर बसला होता असं त्याने सांगितले.

१० वर्ष विमान प्रवास केला नाही

त्याशिवाय १९९८ मध्ये बोर्डिंग पास नव्हता परंतु न्यूजपेपरमध्ये माझ्या सीटचा नंबर ११ ए असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखे होते, ज्याची झळ मला आजही बसते. या अपघातानंतर मी १० वर्ष विमान प्रवास केला नाही असं रुआंगचुसाकने म्हटलं.

२९७ लोकांचा गेला जीव

गुजरातच्या अहमदाबादहून लंडनसाठी जाणारे एअर इंडियाचे एआय १७१ विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांनी जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत विमानातील २४२ पैकी २४१ लोकांचा जीव गेला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या विमानाला धडकले तिथेही ५६ जणांना जीव गमवावा लागला. या भीषण अपघातातून केवळ रमेश विश्वासकुमार एकटेच बचावले. त्यांचा सीट नंबर ११ ए होता. अखेर ते जिवंत कसे राहिले हे त्यांनाही माहिती नाही. मी मरणार असं मला वाटत होते. परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी जिवंत असल्याची जाणीव झाली. मी सीटबेल्ट काढला आणि शक्य तिथे पळण्याचा प्रयत्न केला असं रमेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद