शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:48 IST

Vijay Rupani Death in Plane Crash: गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांचे एअर इंडिया विमान अपघातात निधन झाले. ते लंडनमध्ये राहत असलेल्या पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले होते. पण...

Vijay Rupani Death News: एअर इंडियाच्या एका भीषण विमानअपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या मुलीच्या भेटीसाठी ते निघाले. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अहमदाबाद विमानतळावरून निघाले, पण अहमदाबादमध्येच त्यांच्या आयुष्याची एका भीषण अपघातात अखेर झाली. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. गुरुवारी (१२ जून) दुपारी लंडनच्या दिशेने झेपावलेल्या या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही होते. तब्बल २४२ जण असलेले हे विमान अहमदाबादमधील मेघानी नगरमध्येच कोसळले. 

विजय रुपाणी यांचा मृत्यू, PM मोदी गुजरातकडे रवाना  

केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विजय रुपाणी यांचे अपघातात निधन झाल्याची माहिती दिली. 

वाचा >>सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन

"आमचे नेते, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे याच विमानातून त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. पण, त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने भाजपच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. हा अपघात इतका मोठा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये येत आहेत. जे जे शक्य असेल, ते इथे येऊन करतील", अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

विजय रुपाणींची पत्नीही मुलीच्या घरी

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची मुलगी लंडनमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी अंजली रुपाणी या लंडनमध्ये मुलीकडे गेल्या. त्यानंतर गुरूवारी (१२ जून) विजय रुपाणीही त्यांच्या भेटीसाठी लंडनला निघाले होते. 

२०४ जणांचा मृत्यू 

एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान खाली कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यामुळे विमानातील बहुतांश प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाVijay Rupaniविजय रूपाणीAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातGujaratगुजरात