शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:46 IST

विजय रुपाणी एअर इंडियाच्या त्याच फ्लाईटमधून प्रवास करत होते जे अहमदाबादहून लंडनला चालले होते.

अहमदाबाद - गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही निधन झाले. हा अपघात इतका भयंकर होता की, विमानातील प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण होते. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबाला डीएनए नमुने देण्यासाठी हॉस्पिटलला बोलावले होते. आज या अपघातात बळी पडलेले विजय रुपाणी यांचे डीएनए नमुने जुळले आहेत. गृहमंत्री हरश संघवी यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी विजय रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबाला सोपवला जाणार आहे.

विजय रुपाणी एअर इंडियाच्या त्याच फ्लाईटमधून प्रवास करत होते जे अहमदाबादहून लंडनला चालले होते. रुपाणी लंडनला मुलाकडे जात होते परंतु त्यांचे विमान टेकऑफ घेताच काही मिनिटांतच खाली कोसळले. या विमानात २४२ लोक होते. त्यातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकमेव प्रवासी सुखरूप बचावला. या दुर्घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. 

या दुर्घटनेतील मृतदेह कुटुंबाला सोपवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राज्य सरकारकडून पीडित कुटुंबाला योग्य ती मदत केली जातेय असं हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी म्हटलं. गुरुवारी ही दुर्घटना घडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये २५० हून अधिक डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वयंसेवकांच्या टीमने तात्काळ बचाव कार्य सुरू केले. हे विमान ज्या इमारतीला धडकले तिथेही बरेच जण जखमी झाले होते. त्यांनाही वेळीच उपचार मिळाल्याने काहींचा जीव वाचला. सध्या डिएनए चाचणीच्या मदतीने मृतदेह पीडितांच्या कुटुंबाला सोपवण्याचे काम सुरू आहे.

उड्डाणानंतर सात मिनिटांत अपघात

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने गुरुवारी दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले होते. अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे १.४६ वाजता, विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर काही क्षणातच विमानाने ‘मेडे कॉल’ पाठवला आणि काही मिनिटांतच विमान मेघाणी नगर भागातील एका इमारतीजवळ कोसळले. या विमानात २३० प्रवासी, १० केबिन क्रू आणि २ पायलट होते. विमान कोसळल्यानंतर परिसरात तीव्र स्फोटाचा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. अपघातानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये घटनास्थळी विखुरलेले मृतदेह, विखंडित अवस्थेत विमानाचे अवशेष आणि परिसरात माजलेला हाहाकार दिसून येत होता. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातVijay Rupaniविजय रूपाणी