शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:50 IST

Ahmedabad Plane Crash Survivor : रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते

अहमदाबाद - गुरुवारी दुपारी लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावरील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. हा अपघात इतका भयंकर होता की दुर्घटनेनंतर विमान जळून खाक झाले. त्याशिवाय ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीलाही आग लागली. या विमानात २ पायलट, १० क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. भीषण दुर्घटनेत कुणीही वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात आले. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार विमान अपघातातून एक प्रवासी सुखरूप असल्याचे पुढे आले आहे.

या दुर्घटनेबाबत अहमदाबाद पोलीस आयुक्त जी.एस मलिक यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एक प्रवासी जिवंत आढळला आहे. हा प्रवासी A11 या सीट नंबरवर होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्याबाबत अद्याप सांगू शकत नाही. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे कारण विमान नागरी वस्तीत कोसळले आहे असं त्यांनी म्हटलं.

माहितीनुसार, या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वासकुमार असं आहे, ते ४० वर्षाचे मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे नागरिक आहेत. या दुर्घटनेतून विश्वास रमेश वाचल्याने हा चमत्कारच मानला जात आहे. रमेश विश्वासकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातून बचावलेल्या रमेश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संवाद साधला. ज्यात एक जोरदार स्फोट झाला. चहुबाजूने आग लागली होती. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला आणले. मी जिवंत आहे यावर मला विश्वास बसत नाही. हे चमत्कारापेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते. परंतु जेव्हा हे विमान क्रॅश झाले तेव्हा आपत्कालीन दरवाजातून त्यांनी उडी घेतली असल्याचे बोलले जाते. एअर इंडियाच्या या दुर्घटनेत जवळपास २०० हून अधिक प्रवासी मृत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटींची मदत करण्याचं जाहीर केले आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघातTataटाटा