शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:11 IST

विल बोइंग यांनी अमेरिकेच्या सिएटलमध्ये १९१६ साली बोइंग कंपनीची सुरुवात केली होती. १९३३ साली बोइंगचे पहिले विमान यशस्वीपणे तयार करण्यात आले.

नवी दिल्ली - गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला निघालेले विमान दुर्घटनाग्रस्त झाले. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या अपघातानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे विमान अमेरिकेची कंपनी बोइंगद्वारे तयार केलेले 787-8 ड्रीमलायनर होते. एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेसनुसार बोइंग 787 विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी २ इंजिन असणाऱ्या बोइंग 787 ड्रिमलायनर विमानाच्या अपघाताचा काही रेकॉर्ड नाही. या विमानात २५४ ते २६७ बिझनेस आणि इकोनॉमीच्या सीट असतात. परंतु बोइंगच्या दुसऱ्या विमानांचे आतापर्यंत ६ हजार अपघात झाले आहेत. 

बोइंग 787 विमानात बिघाडाचा मोठा इतिहास आहे. २०२३ साली लंडनला जाणाऱ्या या विमानात आग लागल्याची सूचना देणारे लाईट पेटली होती. ज्यामुळे हे विमान नवी दिल्लीत उतरवावं लागले. जानेवारी २०२४ मध्ये बांगलादेशातून बिमान एअरलाईन्सचे बोइंग 787 विमान सौदी अरबला जात होते, त्याच्या कॉकपिटच्या विंडस्क्रिनमध्ये तडा गेला होता. मे २०२५ मध्ये हैदराबादहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या एका फ्लाइटमध्ये नोज व्हिलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण भरण्यास नकार दिला होता. वेगाने ब्रेक लावल्याने अनेक चाकांची हवा गेली होती. 

२ कंपन्यांचे वर्चस्व

आतापर्यंत बोइंगच्या वेगवेगळ्या विमानांनी जगभरात ६ हजाराहून अधिक दुर्घटना घडल्यात. त्यातील ४०० पेक्षा जास्त अपघात भयंकर आहेत. त्यात जवळपास ९ हजार लोकांचा जीव गेला आहे. अहमदाबाद अपघातात बोइंग 787 ड्रिमलायनरमध्ये झालेली पहिली दुर्घटना आहे ज्याचा खुलासा विमानाच्या ब्लॅक बॉक्समधूनच होऊ शकतो. जगभरात विमान उत्पादन करण्यात २ कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यातील एक आहे अमेरिकन कंपनी बोइंग आणि दुसरी युरोपीय कंपनी एअरबस..या दोन प्रमुख कंपन्या व्यावसायिक विमान उत्पादन करतात. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, युरोप, आशिया आणि उत्तरी अमेरिकेकडील देशांमध्येही बोइंग विमानाचा वापर केला जातो. सध्या जगात कमीत कमी १५० देश या कंपनीच्या विमानाचा वापर करतात. 

१९१६ मध्ये झाली होती स्थापना

विल बोइंग यांनी अमेरिकेच्या सिएटलमध्ये १९१६ साली बोइंग कंपनीची सुरुवात केली होती. १९३३ साली बोइंगचे पहिले विमान यशस्वीपणे तयार करण्यात आले. या विमानाने त्या काळात न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिको अंतर १९ तासांत पार केले होते. जगभरातील प्रवासी विमानांमध्ये 737 मॅक्स, 777 एक्स आणि 787 ड्रिमलायनर या विमानांचा ९० टक्के कब्जा आहे. बोइंग 737 मॅक्स विमानामध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये सलग दोन दुर्घटना घडल्या. त्यानंतर झालेल्या तपासणीत या विमानाच्या मॅन्युवरिंग कॅरेक्टरिक्टिक्स ऑग्मेटेंशन सिस्टममध्ये समस्या असल्याचे पुढे आले. मात्र या २ अपघातात ३४६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता. 

बोइंगचे माजी गुणवत्ता नियंत्रण इंजीनियर जॉन बार्नेट यांनीही या विमानाबाबत सतर्क केले होते. २५ टक्क्यापर्यंत ही विमाने आपत्कालीन स्थितीत उड्डाण करण्यास अयशस्वी राहतात. २०२४ साली बार्नेट यांच्या निधनानंतर बोइंगवर खटला दाखल केला होता. त्यात कंपनीच्या कामाच्या दबावामुळे बार्नेट यांच्यावर मानसिक दडपण असल्याचा आरोप लावला होता. तर बोइंगमध्ये असलेले आणखी एक मॅकेनिक रिचर्ड क्यूवास यांनी २०२३ साली बोइंगच्या उत्पादनावर टीका केली होती. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. बोइंग विमानांवर इतके प्रश्नचिन्ह असले तरी 787 विमान सुरक्षित आहे. दीर्घ काळ वापरामुळे कुठलीही जोखीम नाही असा दावा बोइंग कंपनी करत असते.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातahmedabadअहमदाबाद