शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:25 IST

१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे

अहमदाबाद - गुजरातच्या भीषण विमान अपघाताने देशाला सुन्न केले आहे. या अपघातातील मृत लोकांची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनसाठी झेपावलेले विमान अवघ्या काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले आणि भयंकर दुर्घटना घडली. या अपघातात वडोदरा शहर परिसरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबात अपघाताच्या २ दिवस आधी लग्नसोहळ्याने आनंद होता परंतु या अपघातामुळे हा आनंद काही तासांपुरता मर्यादित राहिला.

१० जून रोजी या कुटुंबातील मुलगा भाविक माहेश्वरीचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाच्या २ दिवसांनीच भाविकचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाविक माहेश्वरी मागील अनेक वर्षापासून लंडनला काम करत होता. प्रत्येक वर्षी १५ दिवस सुट्टी काढून तो वडोदरा इथे त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचा. यावेळीही भाविक भारतात आला. मात्र यंदा लग्न करूनच लंडनला जा असा आग्रह कुटुंबाने धरला. भाविकचा आधीच साखरपुडा झाला होता त्यामुळे कुटुंबाच्या सहमतीने त्याने १० जून रोजी कोर्टात लग्न केले. 

लग्नानंतर भाविक पुन्हा कामासाठी लंडनला जाणार होता. त्यामुळे त्याच्या नवविवाहित पत्नी हसत हसत त्याला निरोप दिला. परंतु हा त्याचा अखेरचा निरोप असेल असं कुणालाही वाटले नाही. फ्लाईटमध्ये चढल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्याची बातमी कानी आली. याच विमानात भाविक असल्याचं कळताच कुटुंब हादरले. या दुर्घटनेतून कुणीची वाचण्याची शक्यता नव्हती. या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात भाविकचा मृत्यू झाल्याचं कुटुंब मानायला तयार नाही. वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव नाही. २ दिवसांपूर्वीच लग्नाची मिठाई सर्वांना वाटली आणि आज भयाण शांतता पसरली. 

विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू

अहमदाबाद ते लंडनला जाणारे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे केवळ प्रवाशांचा जीव गेला नाही तर त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न, भविष्य आणि आशाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. कुणी मुलगा, कुणी वडील तर कुणी अख्खं कुटुंबच अपघातात गमावले आहे. या अपघातामुळे ज्यांच्या परतण्याची वाट पाहायची होती ते आता कधीच परतणार नसल्याने कुटुंब शोकाकूळ आहेत. या अपघातात असे लोकही गेले आहेत ज्यांनी पहिल्यांदा विमान प्रवास सुरू करत स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवत लंडनला चालले होते. मात्र हे सर्व अपूर्णच राहिले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद