शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:17 IST

Air India Plane Crash Latest News: अहमदाबादमधील विमान अपघाताला चार दिवस झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ४७ व्यक्तीचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. 

Air India Plane Crash Update: १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला. अपघातानंतर स्फोट होऊन आग लागल्याने विमानातील सर्वच व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे सध्या डीएनएच्या आधारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९२ डीएनए नमुने जुळले आहेत. पण, ओळख ८७ जणांची पटली आहे. याचेही कारणही डॉक्टरांकडून सांगण्यात आले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गेल्या चार दिवसांत २५० मृतदेहाचे डीएनएसाठी नमुने घेण्यात आले. त्यापैकी ९२ नमुने जुळले आहेत. ज्यांची ओळख पटली, असे ४७ मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत हे मृतदेह त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवले जात आहेत. 

९२ डीएनए नमुने जुळले, मग ८७ जणांची ओळख का पटली?

अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयातील डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले की, इथे आणण्यात आलेल्या मृतदेहांपैकी ९२ मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले आहेत. यात बरेच नमुने एकाच व्यक्तीचे आढळून आले आहेत.

वाचा >>चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन 

अपघातात काही व्यक्तींच्या शरीराचे अवयव वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या अवयवचांचे नमुने घेतले जात आहेत. त्यामुळे ८७ जणांचीच ओळख पटली आहे. आतापर्यंत ४७ जणांचे मृतदेह येथून त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत.

विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतदेह जळालेले असल्याने डीएनएच्या साहाय्याने ओळख पटवण्यात आली. रविवारी (१५ जून) त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यांच्यावर सोमवारी राजकोट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

विजय रुपाणी यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने अहमदाबादवरून राजकोटला नेण्यात येणार आहे. त्यानंतर अत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्काराला हजर राहणार आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातahmedabadअहमदाबाद