शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:19 IST

Air India : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला.

Air India : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. बोईंगचे विमान येथील एका वसतिगृहावर कोसळले. या अपघातामध्ये आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामधील रोज नवीन माहिती समोर येत आहे. 

या घटनेच्या एका आठवड्यानंतर एक खळबळजनक दावा समोर आला आहे. एअर इंडियाच्या दोन वरिष्ठ विमान परिचारिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, अहमदाबाद अपघाताच्या एक वर्ष आधी बोईंग 787 ड्रीमलाइनरमधील तांत्रिक बिघाडाची माहिती दोघांनीही एअरलाइनला दिली होती. 

एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण

तेव्हा एअरलाइनने त्यांना काढून टाकले...

टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, दोन्ही परिचारिकांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, एअरलाइनने केवळ त्यांच्या चिंता फेटाळून लावल्या नाहीत तर त्यांना त्यांचे विधान बदलण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी त्यांचे विधान बदलण्यास नकार दिला तेव्हा एअरलाइनने त्यांना काढून टाकले.

१४ मे २०२४ रोजी ही समस्या उद्भवली होती

या दोन्ही अधिकाऱ्यांनी ड्रीमलाइनरच्या दरवाजात बिघाड झाल्याची तक्रार केल्याचा आरोप केला होता. अहवालानुसार, १४ मे २०२४ रोजी मुंबई-लंडन B787 (VT-ANQ) ही ऑपरेटिंग फ्लाइट AI-129 हीथ्रो येथे डॉक करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. पत्रात म्हटले आहे की, दरवाजा उघडण्यासाठी जबाबदार असलेल्या दोन फ्लाइट अटेंडंटनी तो मॅन्युअल स्थितीत असल्याची पुष्टी करण्यासाठी चेकलिस्ट केली. पण, दरवाजा उघडताच स्लाइड राफ्ट तैनात झाला. दरवाजा ऑटोमॅटिक मोडमध्ये उघडला जातो तेव्हा स्लाइड राफ्ट तैनात होतो. त्यांनी सांगितले की, पायलट आणि केबिन-इनचार्ज यांनी लेखी स्वरूपात दोषाची पुष्टी केली होती.

विमान कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, "आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले पण त्यांनी आमचे म्हणणे बदलण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली."एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी १४ मे २०२४ ची घटना आणि ड्रीमलाइनरच्या दोषांशी संबंधित इतर घटना दडपल्या, असा आरोप त्या पत्रात केला आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांची गंभीरता असूनही, DGCA ने फक्त अनौपचारिक चौकशी सुरू केली आणि तेव्हापासून कोणताही अहवाल शेअर केलेला नाही.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटना