शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:31 IST

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे.

अहमदाबाद - १२ जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला. या अपघातात २५० हून अधिक लोकांचा जीव गेला. या दुर्घटनेतर शनिवारी पहिल्यांदाच नागरी उड्डाण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. एअर इंडिया फ्लाईट एआय १७१ ने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंचीवर पोहचू शकले. ज्यानंतर हे विमान वेगाने खाली आले असं मंत्रालयाने सांगितले.

टेकऑफच्या १ मिनिटांनी पडले विमान, पायलटने दिला होता 'मेडे' कॉल

या पत्रकार परिषदेत नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंची गाठू शकली. त्यानंतर हे विमान खाली येऊ लागले. पायलटने दुपारी १.३९ वाजता एटीसीला मे डे कॉल दिला होता. एक मिनिटानंतर विमान मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले. या दुर्घटनेआधी हे विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबादला विना कुठल्याही तांत्रिक समस्येशिवाय पोहचले होते असंही त्यांनी सांगितले. 

उच्चस्तरीय समितीची स्थापना

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती ३ महिन्यात त्यांचा रिपोर्ट सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. समिती हा अपघात नेमका कसा घडला त्यामागची कारणे तपासेल. सध्याची एसओपी आणि दिशा निर्देशांचा आढावा घेईल आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय पाऊले उचलावी लागतील याची शिफारस करतील. 

ड्रीमलायनरची चौकशी सुरू, ८ विमानांची तपासणी

दरम्यान, DCGA च्या निर्देशानंतर बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची चौकशी होणार आहे. भारतात एकूण ३४ ड्रीमलायनर आहेत ज्यातील ८ विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. ज्यातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे केवळ एकमेव प्रवासी या भीषण अपघातातून सुखरूप बचावला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज परिसरातील इमारतीला धडकले तिथल्या ४० हून अधिक जणांचा जीव गेल्याची भीती वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबाद