शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:53 IST

Air India Tata Group Statement, Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी जारी केले स्टेटमेंट

Air India Tata Group Statement, Plane Crash Ahmedabad: गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी एक मोठा विमानअपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाअपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाने उड्डाण केल्या-केल्या लगेचच मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. विमान एका रुग्णालयावर कोसळल्याची माहिती दिली जात आहे. या घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. यादरम्यान, एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक संदेश जारी केले आहे.

अहमदाबादहून लंडन गॅटविक येथे जाणारे एअर इंडियाचे फ्लाईट AI171 याचा आज अपघात झाला. या वृत्ताची मी अत्यंत दुःखी मनाने पुष्टी करतो. या दुर्दैवी घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांसोबत आमच्या संवेदना आहेत. सध्या आमचे प्राथमिक उद्देश सर्व बाधित लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हेच आहे. आम्ही घटनास्थळी असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना मदत करण्यासाठी आणि बाधितांना आवश्यक ते सर्व मदत करण्यासाठी आमच्या शक्तीनुसार सर्व प्रयत्न करत आहोत. अधिक तथ्ये आणि तपशीलवार माहिती मिळताच पुढील अपडेट्स शेअर केले जातील. अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी एक आपत्कालीन केंद्र ( An emergency centre ) आणि मदत पथक ( support team ) स्थापन करण्यात आले आहे, असा संदेश एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिल्याचे टाटा ग्रुपच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातAccidentअपघात