शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:20 IST

आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर हे दु:ख आम्हाला छळत राहणार असं रवी यांनी म्हटलं. ही दुर्घटना रवी यांच्या कुटुंबावर मोठा आघात आहे. 

Ahmedabad Air India Plane Crash: मागील १५ वर्षापासून मेघानीनगरमध्ये राहणाऱ्या रवी ठाकोर आणि त्याचे कुटुंब दररोज सिव्हिल रुग्णालय परिसरात डॉक्टरांना जेवण देण्याचे काम करतात. परंतु १२ जूनला झालेल्या विमान दुर्घटनेची ती कटू आठवण ते आयुष्यात कधीही विसरू शकत नाहीत. एअर इंडिया विमान दुर्घटनेत रवी यांची आई आणि २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. परंतु सुदैवाने रवी यांनी नकळत ८० डॉक्टरांचा जीव वाचवला आहे. काही डॉक्टर दुपारी जेवणासाठी मेसच्या इमारतीत येणार होते परंतु रवी यांनी त्यांना स्वत: हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन पोहचतोय असा निरोप दिला. १ वाजता रवी मेसमधून निघाले आणि हॉस्पिटलला पोहचले. त्यानंतर १ वाजून ४० मिनिटांनी जे घडले त्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. 

रवी यांचे कुटुंब बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मेसमध्ये डॉक्टरांसाठी जेवण बनवायचे. त्या दिवशी रवी, त्यांची पत्नी ललिता वडील प्रल्हाद ठाकोर आणि एका नातेवाईकांसह टिफिन देण्यासाठी बाहेर पडले. त्यांची २ वर्षाची मुलगी आध्या आई वडिलांच्या मागे लागली परंतु तिला चुकवत ते तिथून बाहेर पडले. प्रचंड उष्णता असल्याने रवी यांनी मुलीसोबत आईलाही मेसच्या इमारतीत ठेवले. जिथे रवी यांची आई किचनमध्ये होती. मुलगी खूप रडत होती, मागे येण्याचा हट्ट करत होती त्यामुळे जेव्हा ती शांत झोपली त्यानंतर रवी आणि त्यांची पत्नी टिफिन देण्यासाठी बाहेर गेले. ही आमची रोजची वेळ होती, मुलीला सोबत घेऊन गेलो नाही असं त्यांनी सांगितले. 

१.४० नंतर सर्वच बदलले

आम्ही रोजप्रमाणे कामात व्यस्त होतो. परंतु १२ जूनला १ वाजून ४० मिनिटांनी सर्वच बदलले. अचानक एक जोरदार स्फोट झाला. आगीच्या विळख्यात सगळीकडे धुराचे लोट पसरले. एअर इंडियाचे विमान मेसच्या इमारतीला धडकले होते. जिथे माझी आई आणि मुलीचा जीव गेला. आम्ही धावत घटनास्थळी पोहचलो परंतु पोलीस आणि इतरांना आम्हाला रोखले. कुटुंबाने आशा सोडली नव्हती. २ दिवस ते सातत्याने घटनास्थळी जात होते. आई आणि मुलगी सुखरूप असावी अशी प्रार्थना ते करत होते. गुरुवारी सकाळी डिएनए रिपोर्टमधून धक्कादायक सत्य कळले, ते दोघेही या जगात नाहीत. आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर हे दु:ख आम्हाला छळत राहणार असं रवी यांनी म्हटलं. ही दुर्घटना रवी यांच्या कुटुंबावर मोठा आघात आहे. 

बोईंग विमानातील बिघाडाबाबत आधीच कळवले होते

दरम्यान, एअर इंडियाच्या दोन वरिष्ठ विमान परिचारिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले आहे की, अहमदाबादअपघाताच्या एक वर्ष आधी बोईंग 787 ड्रीमलाइनरमधील तांत्रिक बिघाडाची माहिती दोघांनीही एअरलाइनला दिली होती.  एअरलाइनने केवळ त्यांच्या चिंता फेटाळून लावल्या नाहीत तर त्यांना त्यांचे विधान बदलण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी त्यांचे विधान बदलण्यास नकार दिला तेव्हा एअरलाइनने त्यांना काढून टाकले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ड्रीमलाइनरच्या दरवाजात बिघाड झाल्याची तक्रार केल्याचा आरोप केला होता.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया