शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Air India Plane Crash : 'वैमानिकांना दोष देऊन मोठ्या विमान कंपन्यांना वाचवलं जातंय...', एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:09 IST

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला.

Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्याविमानाचा १२ जून रोजी अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक अहवालात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 

अहवालानुसार, विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडल्याने हा अपघात झाला. इंधन कटऑफ स्विच बंद असल्याने इंधन इंजिनपर्यंत पोहोचू शकले नाही आणि वेळेअभावी वैमानिकांना परिस्थिती सुधारण्याची संधी मिळाली नाही. 

Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली

यासोबतच कॉकपिटमधील दोन्ही वैमानिकांमधील संभाषणाचे रेकॉर्डिंगही समोर आले आहे, त्यानुसार वैमानिक सुमित सभरवाल यांनी सह-वैमानिकाला विचारले होते की, तुम्ही इंधन स्विच का बंद केला?यावर उत्तर देताना, सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांनी उत्तर दिले की त्यांनी  बंद केले नव्हते. काँग्रेसने आता प्राथमिक तपास अहवालाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आरोपही केले आहेत.

काँग्रेस नेत्याचा आरोप

दरम्यान, आता यावरुन काँग्रेसने आरोप केले आहेत. काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी आरोप केला की, बहुराष्ट्रीय कंपन्यांना संरक्षण दिले जात आहे आणि मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांना दोषी ठरवले जात आहे.

 दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली

एअर इंडियाच्या विमानाचा अपघात १२ जून २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. या विमान अपघाताच्या प्रकरणात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चा अहवाल आला आहे. या अहवालात विमान अपघाताबाबत उड्डाणात काय घडत होते याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक इंजिन सुरू झाले. पण इंजिन २ सुरू झाले नाही.

वैमानिकांनी 'मेडे' कॉल देण्याच्या काही सेकंद आधी विमान वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, "मेडे" कॉलच्या फक्त १३ सेकंद आधी, वैमानिकांनी इंजिन इंधन नियंत्रण स्विच "कटऑफ" वरून "रन" वर परत केला, म्हणजेच इंजिन रीस्टार्ट प्रक्रिया सुरू केली. दुपारी १:३८:५२ वाजता, इंजिन १ चा इंधन स्विच "रन" वर आणला. दुपारी १:३८:५४ वाजता, APU इनलेट दरवाजा उघडण्यास सुरुवात झाली, यामुळे इंजिन सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी १:३८:५६ वाजता, इंजिन २ देखील "रन" वर स्विच करण्यात आले. या प्रक्रियेत, FADEC सिस्टम स्वयंचलितपणे इंधन आणि इग्निशनचे नियंत्रण घेते. दोन्ही इंजिनमध्ये EGT मध्ये तीव्र वाढ दिसून आली - ही रिलाईट दाखवते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात