शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Women’s Day 2019 : एअर इंडिया विमानांच्या कॉकपिटमध्ये आज फक्त 'महिलाराज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 10:46 IST

एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत.

ठळक मुद्देएअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत.विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली - जगभरात आज महिला दिन (International Womens Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.  एअर इंडियाने महिला दिनानिमित्त हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एअर इंडियाने महिला दिनानिमित्त एक चांगली घोषणा केली आहे. 

एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे कारण, एअर इंडियाच्या महिला कर्मचारी जागतिक स्तरावर एव्हिएशन क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो' असे म्हटले आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची  धुरा ही आज महिलांच्या हाती असणार आहे.

Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!

गुगलने 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. गुगलने खास डुडलद्वारे स्त्री शक्तीला सलाम केला आहे. आज जगभरात महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन (International Womens Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत. गुगलने या खास आणि महत्त्वपूर्ण डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे.

Women's Day Special : ‘जागतिक महिला दिन’ 8 मार्चला का साजरा केला जातो?आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च हा महिला दिवस 1943 साली साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975  हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही 8 मार्च साजरा होत आहे. 

 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAir Indiaएअर इंडिया