शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:37 IST

अहमदाबाद विमान अपघातानंतर सुमारे ५ दिवसांनी एअर इंडियाचे विमान पुन्हा लंडनला जाणार होते. पण, उड्डाणापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला.

Air India: गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर विमान उड्डाणांबाबत बरीच खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता आज(दि.17) पुन्हा एकदा अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे अचानक एअर इंडियाचे विमान AI-159 रद्द केल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. 

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान अहमदाबादेतूनच लंडनला जाणार होते. परंतु उड्डाणापूर्वी त्याची तपासणी करण्यात आली असता, त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यामुळे विमानाची उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आली. अचानक उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. या विमानातील बहुतांश प्रवासी इतर शहरातील आहेत. आता या विमानाची उड्डाण कधी होणार, हे अद्याप सांगण्यात आले नाही.

एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये बिघाडगेल्या आठवड्यात अहमदाबादच्या झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत बिघाडाच्या बातम्या येत आहेत. काल हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाची तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली, तर अमेरिकेहून मुंबईला येणाऱ्या एका विमानाला कोलकातामध्ये उतरवावे लागले.

 

इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकीआज सकाळी 9.20 वाजता, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6ई 2706 ला बॉम्बची धमकी मिळाली, त्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये विमान क्रमांकाचाही स्पष्ट उल्लेख असल्याने धोका गंभीर असल्याचे मानण्यात आले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानPlane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातIndigoइंडिगो