शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:22 IST

Air India Plane: मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमागे लागलेलं संकटाचं शुक्लकाष्ट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, एअर इंडियाने शनिवारी या घटनेला दुजोरा दिला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान मुंबईत माघारी आणले, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

विमानातील केबिनमधून जळाल्याचा वास आल्यानंतर विमानाला माघारी आणण्यात आलं. तसेच हे विमान मुंबईमध्ये सुखरूपरीत्या उतरलं. त्यानंतर प्रवाशांच्या सोईसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. प्रवशांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, असेही एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

याचप्रमाणे शुक्रवारी एअर इंडियाच्या आणखी एका विमानामध्येही नॉन स्पेसिफिक सिक्युरिटी अलर्ट मिळाला होता. मात्र सुरक्षेच्या सर्व मापदंडांची पडताळणी केल्यानंतर त्या विमानाला पुढील उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

अन्य एका घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दिल्लीहून जम्मूला जात असलेल्या आयएक्स२५६४ या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर दिल्लीला माघारी आणावं लागलं होतं.  हे विमान सकाळी १०.४० वाजता उड्डाण करणार होतं. मात्र ते ११ वाजून ४ मिनिटांनी रवाना झालं. ते १२ वाजून ५ मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होतं. मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही वेळातच त्याला दिल्लीला माघारी आणण्यात आलं.  -----------------------------------------

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानMumbaiमुंबई