शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 12:50 IST

Air India Plane Crash in Kerla, latest news: ISFचा ASI अजीत सिंग यांनी ही घटना पाहिली.

कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले.  रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक दीपक साठे यांचाही समावेश आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली, हे एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. (Air India Express Accident) 

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

हे विमान बोर्इंग 737 होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. 7.41 वाजता विमानतळावर उतरले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात 174 प्रौढ प्रवासी, 10 तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण 190 जण होते. कोळीकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता. अनुभवी वैमानिक दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. पण, या प्रयत्नांत दोघांचाही मृत्यू झाला. (Air India Express Accident) 

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

ISFचा ASI अजीत सिंग यांनी ही घटना पाहिली. त्यांनी सांगितले की,''मी ड्युटीवर होतो. साडेसात वाजता मी तिसऱ्या राऊंडसाठी निघालो. मी PO 2 गेटवर पोहोचलो, ते आमचा आपत्कालीन गेट आहे. तेथे ASI मंगल सिंग होते. मी त्यांच्याकडे स्वाक्षरी करण्यासाठी बुक मागितली आणि त्यांच्यासोबत थोडी चर्चा करत होतो. तेव्हा मी पाहिलं की एअर इंडीयाचं एक विमान असंतुलीत होऊन पॅरामीटर रोडच्या दिशेनं खाली पडत होतं. तेव्हा मी कंट्रोल रुमला त्वरित सांगितले. तोपर्यंत विमान खाली पडलं होतं. त्यामुळे यंत्रणा त्वरित मदतीला पोहोचली. गेट नंबर 8 उघडल्यानंतर 25-30 व्हॉलेंटीयर मदतीसाठी आले, एक जेसीबीपण आली. त्यानं मातीखाली दबलेल्या प्रवाशांना काढण्यात येत होतं. CISFचे सर्व जवानही मदतीला आले.'' (Air India Express Accident) 

शतकी आघाडी घेऊनही पाकिस्तानची हाराकिरी; तिसऱ्या दिवशी पडल्या 14 विकेट्स  

बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस