शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:50 IST

Air India: गेल्या काही काळापासून एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत.

Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनंर Air India च्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामुळे कधी विमानाचे उड्डाण रद्द केले जाते, कधी आपत्कालीन लँडिंग केली जाते, तर कधी विमान दुसऱ्याच ठिकाणी डायव्हर्ट केले जाते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. विमानाच्या केबिनमध्ये अचानक तापमान वाढवल्यामुळे टोकियोला जाणारे विमान कोलकाताकडे वळवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान टोकियोच्या हनेदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेऊन २९ जून रोजी सांयकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र केबिनमधील तापमान अचानक वाढल्यामुळे विमानाला कोलकाताच्या दिशेने वळवण्यात आले. विमानाची कोलकाता येथे सुरक्षितपणे लँडिंग झाल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढून विमानाची तपासणी सुरू आहे. 

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, या अनपेक्षित घटनेमुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी कोलकाता येथील आमचे ग्राउंड सहकारी प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. विमानातील प्रवाशांना शक्य तितक्या लवकर परत दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरीही व्यक्त केली.  दरम्यान, यापूर्वी २३ जून रोजी अशाच एका घटनेत एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमानातील (AI130) सहा क्रू सदस्यांसह ११ प्रवाशांनी मळमळ आणि चक्कर आल्याची तक्रार केली होती. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानJapanजपानIndiaभारतdelhiदिल्लीAirportविमानतळ