शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:10 IST

Air India Ahmedabad Plane Crash: विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज दुपारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादविमानतळावरूनएअर इंडियाच्या बी७८७ या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते विमानतळाबाहेरील परिसरात कोसळले. या विमानामध्ये प्रवासी आणि कर्मचारी मिळून २४२ होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता. त्यामधून वैमानिकाने विमानातील गंभीर आणीबाणीचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले.  

डीजीसीएने विमान अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी एअर इंडियाच्या बी७८७ या विमानाने अहमदाबादहून गेटविकच्या दिशेने उड्डाण केले होते.  मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. या विमानामधून एकूण २४२ जण प्रवास करत होते. त्यामध्ये २ वैमानिक आणि १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते. तर त्यांच्यासोबत क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफिसर होते. सुमित सभरवाल यांना ८ हजार २०० तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. तर क्लाईव्ह यांना ११०० तासांचा अनुभव आहे.

या विमानाने अहमदाबाद विमानतळावरील २३ क्रमांकाच्या धावपट्टीवरून १ वाजून ३९ मिनिटांनी उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेडे कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीला कुठलाही सिग्नल मिळाला नाही. तसेच काही क्षणांतच हे विमान खाली कोसळून आगीचे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसले.

मेडे कॉल (Mayday Call) म्हणजे काय?मेडे कॉल (Mayday Call) म्हणजे विमानात उदभवलेल्या आणीबाणीचा संदेश असतो. विमानामध्ये काही गंभीर परिस्थिती किंवा समस्या निर्माण होऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर वैमानिकांकडून मेडे कॉल दिला जातो.  या कॉलच्या माध्यमातून वैमानिक एटीसी आणि जवळच्या विमानांना आपल्याला तातडीने मदतीची गरज असल्याचा संदेश देतो. मेडे कॉलच्या वेळी तीन वेळा Mayday...., Mayday...., Mayday... असा संदेश दिला जातो. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाairplaneविमान