शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:15 IST

अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघालेले एअर इंडियाचे फ्लाईट एआय १७१ हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान आज दुपारी उड्डाण करताच काही मिनिटांत मेघाणी नगर भागात कोसळले.

गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ काही मिनिटांतच कोसळले आणि २४२ जिवांची  स्वप्न हवेतच विरून गेली. एका क्षणात अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला, तर या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघालेले एअर इंडियाचे फ्लाईट एआय १७१ हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान आज दुपारी उड्डाण करताच काही मिनिटांत मेघाणी नगर भागात कोसळले. 

या विमानामध्ये २४२ लोक प्रवास करत होते. या भीषण अपघातामुळे संपूर्ण देशात आणि परदेशातही शोककळा पसरली आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी आता गुजरात सरकारने प्रवाशांच्या कुटुंबाला डीएनए नमुने देण्याचे आवाहन केले आहे.

उड्डाणानंतर सात मिनिटांत अपघातसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले होते. अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे १.४६ वाजता, विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर काही क्षणातच विमानाने ‘मेडे कॉल’ पाठवला आणि काही मिनिटांतच विमान मेघाणी नगर भागातील एका इमारतीजवळ कोसळले.

२४२ लोकांची स्वप्न उद्ध्वस्त!या विमानात २३० प्रवासी, १० केबिन क्रू आणि २ पायलट होते. विमान कोसळल्यानंतर परिसरात तीव्र स्फोटाचा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले.

मृतदेह ओळखणेही कठीणअपघातानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये घटनास्थळी विखुरलेले मृतदेह, विखंडित अवस्थेत विमानाचे अवशेष आणि परिसरात माजलेला हाहाकार दिसून येत आहे. अनेक मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाल्याने, गुजरात सरकारने नातेवाईकांना डीएनए नमुने देण्याचे आवाहन केले आहे.

अनुभवी पायलट गमावलेकॅप्टन सुमित सभरवाल हे विमान चालवत होते. त्यांना ८२०० तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्या सोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते, ज्यांना ११०० तासांचा अनुभव होता. एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जाहीर केला आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात