‘हवाई दलात लवकरच महिला लढाऊ वैमानिक’
By Admin | Updated: December 14, 2014 01:35 IST2014-12-14T01:35:35+5:302014-12-14T01:35:35+5:30
नजीकच्या भविष्यात भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिक नियुक्त केल्या जातील, असे एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी येथे म्हटले.

‘हवाई दलात लवकरच महिला लढाऊ वैमानिक’
गया : नजीकच्या भविष्यात भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिक नियुक्त केल्या जातील, असे एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी येथे म्हटले.
हवाई दलाच्या जवळजवळ सर्वच विभागात िया काम करीत आहेत आणि येत्या काळात त्यांना लढाऊ वैमानिक म्हणूनही नियुक्त केले जाईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या वर्षाच्या आरंभी त्यांनी, िया या गरोदर असताना वा त्यांना आरोग्याचे काही प्रश्न असताना त्या लढाऊ विमाने उडविण्याकरिता शारीरिकदृष्टय़ा पुरेशा सक्षम नसतात, असे म्हटले होते. संरक्षण क्षेत्रत परकीय गुंतवणुकीच्या पावलाचे स्वागत करताना, हे पाऊल योग्य दिशेने टाकले गेले असून लष्कराला अद्ययावत करण्यात ते मदत करेल, संरक्षण क्षेत्रत संशोधन व उत्पादनातही त्याचा मोठा हातभार लागू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्राच्या 6 व्या शपथग्रहण कार्यक्रमाकरिता आले होते. त्यांनी यावेळी धीरज सिंग यांना प्रशिक्षणात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदकाने गौरविले. त्याचप्रमाणो महेंदरपाल यांना रौप्य तर साहील पाटील यांना कांस्य पदक देऊन गौरविले. (वृत्तसंस्था)