इराकवर हवाई हल्ले

By Admin | Updated: August 9, 2014 03:08 IST2014-08-09T03:08:41+5:302014-08-09T03:08:41+5:30

इराकमधील अतिरेक्यांच्या प्रभावाखाली असलेल्या इरबिल शहराजवळ अमेरिकेने शुक्रवारी हवाई हल्ला चढवला.

Air attacks on Iraq | इराकवर हवाई हल्ले

इराकवर हवाई हल्ले

>अमेरिकेची चढाई : मध्य-पूव्रेत पुन्हा युद्धाला तोंड फुटणार
वॉशिंग्टन : इराकमधील अतिरेक्यांच्या प्रभावाखाली असलेल्या इरबिल शहराजवळ अमेरिकेने शुक्रवारी हवाई हल्ला चढवला. अतिरेक्यांच्या फिरत्या तोफखान्यावर लेजर निर्देशित बॉम्ब टाकत अमेरिकेच्या लष्कराने कारवाईला सुरुवात केली. अतिरेक्यांची आगेकूच रोखण्यासाठी हल्ले सुरू करण्यात आले.
पेंटॅगॉनचे प्रवक्ते अॅडमिरल जॉन किरबी यांनी सांगितले की, इरबिल शहराजवळ एफ/ए-18 जातीच्या 2 विमानांनी 5क्क् पाऊंडचे लेजर निर्देशित बॉम्ब टाकले. आयएसआयएलचे या भागावर प्रभुत्व असून, कुर्दिश सेनेवर हल्ला करण्यासाठी ज्या तोफखान्याचा वापर करण्यात येत होता, त्यावरच हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करण्याचा निर्णय अत्यंत उच्चस्तरावर घेण्यात आला होता. अमेरिकेच्या सैन्याला धोका उत्पन्न करणा:या आयएसआयएलविरोधात अमेरिका थेट कारवाई करेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कालच स्पष्ट केले होते, असेही त्यांनी सांगितले. हजारो निरपराध लोकांचा जीव धोक्यात असताना अमेरिका गप्प बसणार नाही, असे ओबामा म्हणाले होते. 
 
सुरक्षा परिषदेकडून अतिरेक्यांच्या हल्ल्याचा निषेध
च्इराकमध्ये अतिरेक्यांनी अल्पसंख्याकांवर चढविलेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान-की-मून यांनी या स्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाने इराक सरकारला पाठबळ द्यावे, असे आवाहन केले आहे. इस्लामिक स्टेट (आयएस)ने किरकुक, काराकोश व तल अफर आणि सिंजर येथे चढविलेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला. 
 
एफ/ए-18 
या जातीच्या दोन विमानांनी इरबिल शहराजवळ 5क्क् पाऊंडचे लेजर निर्देशित बॉम्ब टाकले.
 
सी-17 सी-13क्
या जातीच्या विमानातून एकाच वेळी अनेक हवाईतळांवरून या लोकांसाठी अन्न-पाण्याची पाकिटे असलेले 72 गठ्ठे या भागात टाकण्यात आले.
 
वायव्य इराकमधील पहाडी भागात अडकलेल्या हजारो अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात असताना अमेरिका डोळे मिटून गप्प बसणार नाही. अतिरेक्यांच्या अड्डय़ांना लक्ष्य करून लष्करी हवाई हल्ले चढविण्याचे आदेश अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकी लष्कराला दिले होते.
 
अन्न-पाण्याची 
पाकिटे केली पोहोचती
च्जीव मुठीत धरून अतिरेक्यांच्या तावडीतून पळ काढून सिंजर पहाडी भागात अडकलेल्या हजारो इराकी नागरिकांच्या मदतीसाठी अमेरिकी लष्कराने विमानातून अन्नाची पाकिटे आणि पाण्याची पाकिटे टाकण्याची मोहीमही फत्ते केली. 
 
च्अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगल सध्या भारताच्या दौ:यावर आहेत. नवी दिल्ली येथे त्यांनीही जारी केलेल्या निवेदनात हल्ल्याचा इरादा स्पष्ट केला होता.

Web Title: Air attacks on Iraq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.