शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एअर अ‍ॅम्ब्युलन्सने चोक्सीला भारतात आणू - ईडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:38 IST

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची अँटिग्वामध्ये जाऊन चौकशी करण्यास अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्ट नकार देताना, त्याला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून आणण्याची तयारी दर्शविली.

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची अँटिग्वामध्ये जाऊन चौकशी करण्यास अंमलबजावणी संचालनालयाने स्पष्ट नकार देताना, त्याला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून आणण्याची तयारी दर्शविली.चोक्सीची प्रकृती ठीक नसल्याने तो भारतात चौकशीसाठी येऊ शकत नसेल, तर आम्ही त्याला एअर अ‍ॅम्ब्युलन्सने आणू. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असतील, असेही ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ईडीने पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रक्रियेला स्थगित मिळावी, यासाठी चोक्सीने उच्च न्यायालयात दोन याचिका केल्या आहेत. त्यावरील प्रतिज्ञापत्रात चोक्सीने मी फरार नसून प्रकृतीच्या कारणास्तव अँटीग्वामध्ये असून, भारतात येऊ शकत नाही. तपास यंत्रणेला अँटिग्वामध्ये चौकशीसाठी सहकार्य करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. या प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना ईडीने चोक्सीचे सर्व दावे फेटाळले.आपली ६,१२९ कोटींची संपत्ती जप्त केल्याचा चोक्सीचा दावा न्यायालयात ईडीने फेटाळला आहे. चोक्सीची २१०० कोटींची संपत्ती जप्त केली आहे आणि देश सोडून जाण्यापूर्वी चोक्सीने ती विकण्याचा प्रयत्न केला होता, असे ईडीने म्हटले आहे.‘चोक्सीने तपासात कधीच सहकार्य केले नाही. विशेष न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली. मात्र, त्याने भारतात परतण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी विनंती ईडीने न्यायालयाला केली आहे. ईडी १३,००० कोटी रुपये पीनएबी घोटाळयाचा तपास करत आहे. या प्रकरणात मेहुल चोक्सीचा भाचा नीरव मोदी मुख्य आरोपी आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयIndiaभारत