शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 16:05 IST

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळविला आहे. टीएमसी एकूण 292 जागांपैकी 213 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 77 जागाच जिंकता आल्या आहेत. दोन दोन जागा इतरांनी जिंकल्या आहेत.

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने अनेक व्हिडिओ जारी करत टीएमसीचे कार्यकर्ते हिंसाचार करत असल्याचा दावा केला आहे. या हिंसाचारात आपल्या 9 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे भाजपने म्हटले आहे. तसेच टीएमसीचे कार्यकर्ते भाजपच्या लोकांच्या घरावरही हल्ले करत आहेत, असा दावाही भाजपने केला आहे. (AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result)

बंगालमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर एआयएमआयएम प्रमूख आणि हैदराबादमधील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, जीवनाचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे. नागरिकांचे रक्षण करणे हे कुठल्याही सरकारचे आद्य कर्तव्य असायला हवे. मात्र, ते असे करत नसतील, तर ते आपले मूलभूत कर्तव्य पार राडण्यात अयशस्वी ठरत आहेत आणि आपण जीवन रक्षणाच्या बाबतीत कुठल्याही सरकारच्या अपयशाची निंदा करतो. 

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

यापूर्वी, पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चिंता व्यक्त केली आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही म्हटले आहे, की पंतप्रधानांनी मला फोन केला आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेप्रती चिंता व्यक्त केली आहे. तत्पूर्वी, केद्रिय ग्रृहमंत्रालयाने सोमवारी राज्य सरकारकडून हिंसाचारासंदर्भात अहवाल मागविला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळविला आहे. टीएमसी एकूण 292 जागांपैकी 213 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 77 जागाच जिंकता आल्या आहेत. दोन दोन जागा इतरांनी जिंकल्या आहेत.CoronaVirus: भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी आता 'या' सर्वात जवळच्या मित्रानं दिला हात, पाठवणार मोठी मदत!

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन