CoronaVirus News: डॉक्टर नव्हे देवदूत! रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पीपीई किट बाजूला सारून उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 15:59 IST2020-05-11T15:56:43+5:302020-05-11T15:59:25+5:30
CoronaVirus News:कोरोनाग्रस्ताचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरकडून स्वत: जीव धोक्यात

CoronaVirus News: डॉक्टर नव्हे देवदूत! रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पीपीई किट बाजूला सारून उपचार
नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात देशातले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. स्वत:च्या प्राणांची काळजी न करता डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. रुग्णसेवा करताना कोरोनाची लागण होण्याचा धोका असतानाही डॉक्टर्स मागे हटलेले नाहीत. नवी दिल्लीच्या एम्समध्ये एका डॉक्टरनं रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरनं पीपीई किट काढून उपचार केले. कोरोनाची लागण होण्याची शक्यता असूनही डॉक्टरनं हे धाडस केलं.
शुक्रवारी डॉ. जाहिद अब्दुल माजीद यांना एका कोरोना रुग्णाला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यासाठी बोलावण्यात आलं. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागचे रहिवासी असलेले मजीद तातडीनं रुग्णासाठी धावून गेले. त्यावेळी माजीद यांना रोजा सोडायचा होता. मात्र रुग्णाची परिस्थिती नाजूक असल्यानं त्यांनी मदतीसाठी लगेचच धाव घेतली.
कोरोना रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. त्याला रुग्णवाहिकेतून आयसीयूमध्ये नेलं जातं होतं. मात्र कृत्रिम श्वासोच्छवास देणाऱ्या नळीतून श्वास घेण्यात रुग्णास अडचण भासत होती. यामुळे रुग्णाचा जीव जाण्याचा धोका होता. त्यामुळे माजीद यांनी ती नळी पुन्हा व्यवस्थित लावण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये एक समस्या होती. रुग्णवाहिकेत पुरेसा प्रकाश नव्हता आणि त्यात पीपीई किटमुळे माजीद यांना फारसं नीट दिसत नव्हतं.
रुग्णाला श्वास घेण्यात अडचण येत असल्यानं त्याचा जीव धोक्यात सापडला होता. त्यामुळे माजीद यांनी मागचा पुढचा विचार न करता थेट फेस शील्ड आणि गॉगल हटवण्याचं ठरवलं. यामुळे माजीद यांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता होती. मात्र रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी माजीद यांनी स्वत:ला जीव धोक्यात घातला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून माजीद यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं.
चीननं महिन्याभरानंतर लॉकडाऊन उठवला अन् ज्याची भीती होती तोच प्रकार घडला
...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर
गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताच्या 'मास्टरस्ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज