शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:26 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash: विमान अपघाताचा व्हिडीओ पाहिला तर विमानाच्या पंखांवर अ‍ॅलिरॉन दिसले नाहीत. जेव्हा विमान वळतं किंवा एका बाजूला झुकतं, तेव्हा त्याच्या पंखांवर 'अ‍ॅलिरॉन' नावाचे छोटे भाग हलतात. पण व्हिडीओत दोन्ही पंखांच्या टोकांवर अ‍ॅलिरॉनची हालचाल दिसत नाही.

- सारंग माने(एअरोस्पेस इंजिनिअर)विमान अपघाताचा व्हिडीओ पाहिला तर विमानाच्या पंखांवर अ‍ॅलिरॉन दिसले नाहीत. जेव्हा विमान वळतं किंवा एका बाजूला झुकतं, तेव्हा त्याच्या पंखांवर 'अ‍ॅलिरॉन' नावाचे छोटे भाग हलतात. पण व्हिडीओत दोन्ही पंखांच्या टोकांवर अ‍ॅलिरॉनची हालचाल दिसत नाही. अशा हलक्या हालचालीमुळे विमानाला वर उचलण्यासाठी लागणारी शक्ती (लिफ्ट) तयार झाली नाही. 

या वेळेपासून विमानाच्या पंखावर "स्पॉयलर" किंवा "एअरब्रेक" दिसायला लागतात. हे भाग विमान थांबवताना वापरले जातात. याच क्षणापासून विमान हळूहळू खाली पडताना दिसतं. थोडक्यात सांगायचं झालं, तर: या व्हिडिओमध्ये अ‍ॅलिरॉनची हालचाल स्पष्ट दिसत नाही. पण ३ मिनिट ३४ सेकंदापासून 'स्पॉयलर' वापरून विमान जमिनीवर उतरण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट दिसतं. हे कशामुळे झाले हे तपासावे लागणार आहे. त्यातून नेमके कारण, स्पष्ट होईल. पायलट शेवटच्या क्षणांपर्यंत उड्डाण थांबवू शकतो. त्यामुळे समस्या अचानक आली असावी आणि ती इतकी  गंभीर होती की पायलटही काही करू शकले नाहीत.

ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल उपकरण आहे, जे उड्डाणादरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचे संभाषण रेकॉर्ड करते.याला 'ब्लॅक' बॉक्स का म्हणतात? तो खरंच काळा असतो का?नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी तो काळा नसतो. तो चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल.ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात?ब्लॅक बॉक्समध्ये दोन मुख्य घटक असतात: १. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) - विमानाचे वेग, उंची, दिशा, इंजिन माहिती रेकॉर्ड करतो. २. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) - पायलट व सह-पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो.

विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय असते?अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते. ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे.अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो?ब्लॅक बॉक्स टायटॅनियमसारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो. तो उच्च तापमान, पाण्याचा दाब, धक्के सहन करू शकतो. त्यामुळे तो अपघातानंतरही सुरक्षित राहतो.ब्लॅक बॉक्स कुठे बसवलेला असतो? ब्लॅक बॉक्स विमानात मागच्या भागात बसवलेला असतो, कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसानग्रस्त होतो. नेमकं काय असतं याचं काम?ब्लॅक बॉक्स किती डेटा साठवू शकतो?त्यात सतत डेटा रेकॉर्ड केला जातो. जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो. अनेक दिवसांचा आवाज व तांत्रिक डेटा यात साठवलेला असतो.भारतात कोणत्या संस्था ब्लॅक बॉक्स तपासतात? भारतात अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी खालील संस्था करतात: १. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), २. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी)ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का? मुख्य वापर अपघाताच्या चौकशीसाठीच असतो, पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठीही ब्लॅक बॉक्समधील डेटा उपयुक्त असतो.ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर?जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही, तर अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोध पथक पाठवले जाते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद