शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:10 IST

Ahmedbad Plane Crash, Air India Eye Witness: "आम्ही १०-१५ मृतदेह बाहेर काढले, त्यातले दोन जण आमचेच मित्र होते..."

Ahmedbad Plane Crash, Air India Eye Witness: अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान गुरुवारी  दुपारी दीडच्या सुमारास टेकऑफ घेतल्यावर लगेचच कोसळले ( Ahmedabad Plane Crash ) आणि मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाचे ( Air India ) बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान एआय-१७१ असे हे विमान होते. अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान अवघ्या तीन मिनिटांत एक मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि हॉस्टेलमध्ये तेव्हा उपस्थित असलेले लोक यांचाही मृत्यू झाला. याच हॉस्टेलमधून अपघाताच्या अवघ्या ४० सेकंद आधी बाहेर पडलेल्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने या दुर्घटनेतील अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितले.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, विमान वर गेलं आणि लगेच खाली येऊन आदळलं. मी केवळ ४० सेकंदाच्या फरकाने वाचलो. नाहीतर मीदेखील त्यांच्यासोबत मेलो असतो. आतमध्ये सगळे विद्यार्थी लंच टाइममध्ये जेवत होते. आत सिलेंडरदेखील होते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर मी लगेच माझ्या मित्रांना फोन केला. आम्ही सगळे लोक कॅन्टीनमध्ये घुसलो. आम्ही पाहिलं तेव्हा विमानातील सामानाच्या खाली भिंत आणि त्याखाली जेवता-जेवता ढिगाऱ्याखाली अडकलेले विद्यार्थी होते. एक मृतदेह तर असा होता, ज्यात त्या व्यक्तीच्या हातात चमचा होता, तो बिचारा जेवत होता त्यावेळी त्याला मरण आलं, अशी हृदयद्रावक घटना त्याने पीटीआयशी बोलताना सांगितली.

त्याने पुढे सांगितले की, आमच्या मित्रांच्या ग्रुपने सर्वात आधी सिलेंडर बाहेर काढले. कारण सिलेंडर आत असते तर अजून मोठा ब्लास्ट झाला असता. त्यामुळे सिलेंडर बाहेर आणले, त्यानंतर मृतदेह बाहेर काढले. एका मित्राच्या पायात काचा रुतल्या होत्या, तरीही त्याने त्याची पर्वा न करता लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

मी आतमध्ये होते त्यावेळी केवळ आग वाढत चालली होती. फायर एस्टींगविशर काम करत नव्हते. अखेर आम्ही जवळपास १०-१५ मृतदेह बाहेर काढले. त्यापैकी दोघे आमचे मित्रच होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला. आमच्यासमोर जे घडलं ते पाहून आम्हालाच वाईट वाटत होतं, असेही तो मुलगा म्हणाला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमान