शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:01 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघातात 295 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा भीषण अपघात झाला. 242 प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारे विमान टेकऑफनंतर लगेच कोसळले. या अपघातात आतापर्यंत 295 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विमान अपघातानंतर बचाव कार्यही पूर्ण झाले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की, विमान कोसळताच इंधनाने पेट घेतला आणि संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला. यामुळे विमानाच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान सुमारे 1,000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. भीषण आगीमुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणी येत होत्या. 

एसडीआरएफच्या आणखी एका अधिकाऱ्याने दावा केला की, तापमान इतके वाढले की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनास्थळी असलेले कुत्रे आणि पक्षीही आगीत जळून खाक झाले. त्यांनाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी), तसेच अमेरिका आणि ब्रिटनमधील पथकांकडून आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केली जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अपघातस्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि अनेक उच्च अधिकाऱ्यांनी परिस्थिती सविस्तरपणे समजावून सांगितली. यानंतर, पंतप्रधानांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमींची भेट घेतली. पंतप्रधानांनी जखमींना धीर दिला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांपूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी गुरुवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला होता. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादairplaneविमानAccidentअपघातfireआग