शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:58 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला असून या विमानात २४२ लोक प्रवास करत होते.

Ahmedabad Plane Crash: आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. हे विमान लंडनसाठी निघाले होते, या विमानामध्ये २४२ लोक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू आहे. एका इमारतीवर हे विमान कोसळले. या अपघाताने संपूर्ण देश हादरला. विमानात २३० प्रवासी आणि २ वैमानिकांसह १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. 

विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटांत विमान कोसळले. हे विमान ज्या भागात कोसळले तो रहिवासी भाग होता. बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पहिले विमान धडकले.यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते.

विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना

८ मिनिटांत नेमकं काय घडलं?

हे एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर एक मोठे विमान आहे. हे ११ वर्षे जुने विमान आहे. गुरुवारी दुपारी १:३० वाजता उड्डाण करण्यापूर्वी ते धावपट्टीच्या मध्यभागी होते. दुपारी १:३८ वाजता विमान धावपट्टीच्या शेवटी होते. विमानाने उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण घेतले आणि समुद्रसपाटीपासून ६२५ फूट उंचीवर सिग्नल गमावला. विमानतळ समुद्रसपाटीपासून सुमारे २०० फूट उंचीवर आहे, म्हणजेच विमान विमानतळापासून सुमारे ४०० फूट उंचीवर उड्डाण केले. विमानाचा सिग्नल सुमारे ८ मिनिटे सक्रिय राहिला आणि दुपारी १:३९ वाजता विमान कोसळले.

विमान उंचीवर असते तर वाचण्यासाठी वेळ मिळाला असता

हे विमान समुद्रसपाटीपासून सुमारे ६२५ फूट उंचीवर होते, जर ते ३५००० फूट उंचीवर असते तर क्रू मेंबर्सना परिस्थिती हाताळण्यासाठी अधिक वेळ मिळाला असता. विमानात सुमारे ५२ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते. पण या अपघातात पायलटला फक्त एक मिनिटाचा वेळ मिळाला.

लँडिंग गियर व्यवस्थित बंद झाले नसावे. कारण एक चाक इमारतीत अडकलेले दिसत आहे. याचा अर्थ असा की विमानातील संतुलन बिघाडामुळे हा अपघात झाला असावा. चौकशीनंतरच या अपघाताची कारणे समोर येऊ शकतात. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादAccidentअपघात