शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश

By संतोष कनमुसे | Updated: June 12, 2025 17:08 IST

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या विमानात २४२ लोक होते.

Ahmedabad Plane Crash:  गुजरातमधील अहमदाबादमध्येएअर इंडियाचे विमान कोसळल्याची माहिती समोर आली. या विमानामध्ये २४२ लोक प्रवास करत होते. विमान अपघातामधील मृतांचा आणि जखमींचा आकडा अजूनही समोर आलेला नाही. दरम्यान, या विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली आहे. या यादीमध्ये दोन मराठी नावांचा समावेश आहे.

Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या

अहमदाबाद येथील विमानतळावरुन टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या ८ मिनिटांमध्ये हे विमान विमानतळाच्या सीमेजवळ कोसळले. अपघातस्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. हे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले असून या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी 

१.क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर 

२.सुमित सबरवाल 

३.अपर्णा महाडिक 

४.श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1

५.दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2

६.इरफान शेख 

७.नंथेम सिंगसेन

८.मैथिली पाटील 

९.मनीषा थापा

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी समोर आली असून या यादीमध्ये दोन मराठी नावांचा समावेश आहे. क्रू मेंबरमध्ये मैथिली पाटील आणि  अपर्णा महाडिक या नावांचा समावेश आहे. हे दोन्ही क्रू मेंबर महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे.  आपर्णा महाडिक या खासदार सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत.

 ११ वर्षे जुने बोईंग विमान

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ ते कोसळले.

बोईंग 787 ड्रीमलायनरचे डिझाइन केलेले आयुष्य ४४,००० उड्डाण चक्रांचे आहे. ते त्याला ३० ते ५० वर्षांचे संभाव्य आयुष्य देते, तर बहुतेक व्यावसायिक जेट्स तेवढ्या काळासाठी सेवेत राहत नाहीत. अहमदाबादमध्ये अपघात झालेले विमान फक्त साडे अकरा वर्षे जुने होते.

बोईंग 787-8 ड्रीमलायनरचे फिचर

बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे एक वाइड-बॉडी, मध्यम आकाराचे आणि लांब पल्ल्याचे विमान आहे. हे  २१०-२५० आसनांसह ८,५०० नॉटिकल मैल पर्यंतचे अंतर कापू शकते. हे २०% कमी इंधन वापरासह डिझाइन केलेले आहे. हे पर्यावरणासाठी देखील चांगले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातGujaratगुजरातahmedabadअहमदाबाद