शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:20 IST

Ahmedabad Plane Crash And Vijay Rupani : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील याच विमानात होते. ते लंडनमधील त्यांच्या मुलीच्या घरी जात होते.

अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या दुःखद अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४ जणांचे मृतदेह सापडले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील याच विमानात होते. ते लंडनमधील त्यांच्या मुलीच्या घरी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली रुपाणी गेल्या अनेक दिवसांपासून लंडनमध्ये होत्या आणि आता ते देखील त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते.

विमान अपघाताची माहिती मिळताच विजय रुपाणी यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शेजाऱ्यांनी त्यांच्या घराजवळील मंदिरात पूजा आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. सध्या रुपाणी कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांच्या घरात कोणीही उपस्थित नाही. 

अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ४१ जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि ढिगाऱ्यात आणखी लोक अडकण्याची शक्यता आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेणेकरून त्यांची ओळख पटेल. 

"माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले.  गुजरातच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले पूनम पटेल म्हणाले की, "माझी वहिनी लंडनला जात होती. एका तासातच मला विमान अपघात झाल्याची बातमी समजली. म्हणूनच मी येथे आलो आहे. तिला बघायलाही अजून मिळालेलं नाही. त्यामुळे काही समजत नाही."

भावना पटेल यांनी "माझी बहीण लंडनला जात होती. तिची फ्लाईट दुपारी १.१० वाजता होती. याच फ्लाईटचा अपघात झाला." तसेच "माझा मुलगा लंच ब्रेक दरम्यान हॉस्टेलमध्ये गेला होता. तेव्हाच तिथे विमान कोसळलं. माझा मुलगा सुरक्षित आहे आणि मी त्याच्याशी बोललो आहे. त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे त्याला  दुखापत झाली आहे" असं  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या रमिला यांनी सांगितलं. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात